Mansukh Hiren हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक, हत्येचं गूढ उकलले?

ठाणे
सुनिल देसले
Updated Mar 21, 2021 | 12:35 IST

Mansukh Hiren Death Case 2 persons arrested by ATS: मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने दोन आरोपींना अटक केली आहे. 

Mansukh Hiren Death Case 2 persons arrested by Maharashtra ATS
Mansukh Hiren हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक 

थोडं पण कामाचं

  • मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात दोन आरोपींना अटक 
  • मनसुख हिरन मृत्यू प्रकरणाचं गूढ उकलले?

मुंबई : मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात महाराष्ट्री एटीएसने दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांच्या अटकेसोबतच मनसुख हिरन मृत्यू प्रकरणाचे गुढ उकलले असल्याचा दावाही करण्यात येत आहे. मात्र, अद्याप या संदर्भात महाराष्ट्र एटीएसकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाहीये. (Mansukh Hiren Death Case 2 persons arrested by Maharashtra ATS)

अटक करण्यात आलेल्या दोन व्यक्ती कोण आहेत या संदर्भात अधिक माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाराष्ट्र एटीएसच्या टीमने या दोन्ही व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले होते आणि चौकशी पूर्ण झाल्यावर या दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या दोन्ही आरोपींना आता ठाण्यातील न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मनसुख हिरन प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ आढळलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आता या प्रकरणाशी संबंधित गाडीचे मालक मनसुख हिरन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपासही काल (२० मार्च २०२१) राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएकडे वर्ग करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराजवळ २५ फेब्रुवारी रोजी एक स्कॉर्पिओ गाडी आढळली. या गाडीत जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या होत्या. यानंतर ज्यांची ही गाडी होती ते गाडीचे मालक मनसुख हिरन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं. विरोधी पक्षाने आक्रमक होत या प्रकरणावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ घातला. तसेच या प्रकरणांचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्याची मागणी केली आणि या संपूर्ण प्रकरणात सचिन वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याचं म्हटलं.

यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांची बदली केली. तर एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने स्फोटक प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतल्यावर सचिन वाझे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. यानंतर १२ तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली. मनसुख हिरन यांच्या कुटुंबियांनीही सचिन वाझे यांच्या भूमिकेवर संशय घेत आरोप केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी