Water Cut In Thane : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात 4 दिवस पाणीकपात

ठाणे
रोहन जुवेकर
Updated Feb 21, 2023 | 08:09 IST

Mega water cut in Thane for 4 days from February 21 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात 4 दिवस पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे.

Mega water cut in Thane for 4 days from February 21
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात 4 दिवस पाणीकपात  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात 4 दिवस पाणीकपात
  • ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिन्यांची कामं होणार
  • जलवाहिन्यांच्या कामांमुळे 21 फेब्रुवारी 2023 ते शुक्रवार 24 फेब्रुवारी 2023 दरम्यान पाणीकपात, पुढील 3 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा

Mega water cut in Thane for 4 days from February 21 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात 4 दिवस पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिन्यांची कामं मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 ते शुक्रवार 24 फेब्रुवारी 2023 दरम्यान होणार आहेत. या कामांमुळे 4 दिवस पाणीकपात होणार आहे. तसेच सोमवार 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत म्हणजे काम पूर्ण झाल्यावर पुढील 3 दिवस ठाण्यात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे. 

स्ट्रॉबेरी खा रोगप्रतिकारक क्षमता वाढवा, या आजारांना दूर ठेवा

ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेची एक मुख्य जलवाहिनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एनएच-३च्या जवळ आहे. या योजनेच्या जलवाहिनीला सहा वेगवेगळ्या ठिकाणी लागलेली गळती बंद करण्याचे काम होणार आहे. या काळात महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून केवळ 50 टक्के पाणीपुरवठा होणार आहे. तसेच साकेत पुलावरील मुख्य जलवाहिनीवर व्हॅक्युम एअरव्हॉल्व्ह बसविणे, इंदिरानगरकडे नव्याने टाकण्यात आलेल्या1168 मिमी जलवाहिनीची तीनहात नाका येथे मुख्य जलवाहिनीशी जोडणी करणे, तसेच पाणीपुरवठ्यामधील दैनंदिन देखभाल आणि दुरुस्तीची अत्यंत आवश्यक कामं 21 ते 24 फेब्रुवारीदरम्यान केली जाणार आहेत. त्यामुळे ठाणे शहरात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा केला जाणार आहे. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत 12 तास, 23 फेब्रुवारी रोजी रात्री 9 ते सकाळी 9 वाजेपर्यंत 12 तास आणि शुक्रवारी 24 फेब्रुवारी रोजी रात्री 9 ते सकाळी 9 वाजेपर्यंत 12 तास असे एकूण 36 तास घोडबंदर रोड, माजिवडा, बाळकुम, ब्रह्मांड, ढोकाळी, कोलशेत, मानपाडा, आझादनगर, पातलीपाडा, डोंगरीपाडा, वाघबीळ, विजयनगरी, कासारवडवली, ओवळा भाईंदरपाडा या भागांमध्ये पाणी बंद राहणार आहे.

दररोज आरामात 10 हजार पावले चालण्याच्या ट्रिक्स

कोबी खाण्याचे फायदे आणि तोटे

21 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी रोजी रात्री 9 ते सकाळी 9 या वेळेत गांधीनगर, सुरकरपाडा, उन्नती, सिद्धांचल, जेल, साकेत, ऋतूपार्क, रुस्तोमजी, कळवा, खारेगाव, आतकोनेश्वरनगर, रघुकुल, मुंब्र्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा बंद असेल. तर 22, 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते रात्री 9 असे सुमारे ३६ तास सिद्धेश्वर, समतानगर, दोस्ती, आकृती, जॉन्सन ईटरनिटी या भागात पाणीपुरवठा होणार नाही. गुरुवारी सकाळी 9 ते शुक्रवारी सकाळी 9 या वेळेत इंदिरानगर, लोकमान्यनगर, किसननगर, श्रीनगर, शांतीनगर, रामनगर, रूपादेवीपाडा, सावरकरनगर, डवलेनगर, परेरानगर, कैलासनगर, भटवाडी या भागांत पाणीपुरवठा होणार नाही.

जगातील सर्वात मजबूत वॉटरप्रूफ मोबाईल

ईशा अंबानीच्या सासूची ख्याती

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी