MHADA Lottery 2023: म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात, जाणून घ्या अर्ज करण्याची सोपी पद्धत

ठाणे
सुनिल देसले
Updated Mar 09, 2023 | 13:43 IST

MHADA Konkan Lottery 2023, Registration process: म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 4 हजार 654 घरांसाठी लॉटरी काढण्यात येत आहे. या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. जाणून घ्या कोणत्या भागात किती घरे आणि अर्ज कसा करायचा...

MHADA konkan lottery 2023 apply online for affordable houses check location prices registration process documents list housing mhada gov in
MHADA Lottery 2023: म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात, जाणून घ्या अर्ज करण्याची सोपी पद्धत (Photo: lottery.mhada.gov.in) 
थोडं पण कामाचं
 • म्हाडाच्या कोकण विभागासाठी ऑनलाईन सोडतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात
 • एकूण 4 हजार 654 घरांसाठी लॉटरी

MHADA Konkan Lottery 2023: मुंबई, ठाणे यासारख्या शहरांत घरांच्या किमती खूपच जास्त आहेत. या परिसरात आपल्या हक्काचे आणि परवडणारे घर असावे असे प्रत्येकाला वाटत असते. हेच लक्षात घेत म्हाडाने परवडणाऱ्या घरांची उभारणी केली आहे. म्हाडाकडून आता कोकण मंडळात 4654 घरांसाठी लॉटरी काढली आहे. या लॉटरीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्जदारांना आता केवळ वेबसाईटवर कागदपत्रे घरबसल्या जमा करायची असून त्यांची पडताळणीही ऑनलाईनच होणार आहे. 

MHADA Konkan Lottery 2023 Time Table

 1. सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची व ऑनलाईन पेमेंट स्वीकृती सुरुवात - 8 मार्च 2023 (दुपारी 12 वाजल्यापासून)
 2. सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आणि वेळ - 10 एप्रिल 2023 (रात्री 11.59 वाजेपर्यंत)
 3. ऑनलाईन पेमेंट स्वीकृती अंतिम दिनांक आणि वेळ - 12 एप्रिल 2023 (रात्री 11.59 वाजेपर्यंत)
 4. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारुप यादी प्रसिद्धी - 27 एप्रिल 2023 (सायंकाळी 6 वाजता) 
 5. सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी - 4 मे 2023 (सायंकाळी 6 वाजता) 
 6. सोडत दिनांक आणि वेळ - 10 मे 2023 (सकाळी 10 वाजता)
 7. सोडतीचे स्थळ - डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, हिरानंदानी मेडोस जवळ, मानपाडा, ठाणे (प)
 8. सोडतीमधील यशस्वी व प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या वेबसाईटवर प्रसिद्धी दिनांक आणि वेळ - 10 मे 2023 (सायंकाळी 6 वाजता)

हे पण वाचा : ऑफिसमध्ये लागत असेल डुलकी तर या टिप्सने पळवा झोप

Income Limit for MHADA Lottery: उत्पन्न मर्यादा

प्रधानमंत्री आवास योजनेकरिता

उत्पन्न गट  कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा
अत्यल्प उत्पन्न गट (EWS) 3,00,000 रुपयांपर्यंत

20 टक्के सर्व समावेक्षक योजना

उत्पन्न गट सुधारित कमाल उत्पन्न मर्यादा (रुपये वार्षिक)
मुंबई महानगर क्षेत्र MMR, पुणे महानगर क्षेत्र PMRDA, नागपूर महानगर क्षेत्र NMRDA, नागपूर सुधार प्रन्यास उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र

अनुज्ञेय क्षेत्रफळ (निव्वळ चटई क्षेत्र) 
Capture Area) 

अत्यल्प उत्पन्न गट (EWS) रुपये 6,00,000 रुपयांपर्यंत रुपये 4,50,000 पर्यंत 30 चौ. मि.पर्यंत
अल्प उत्पन्न गट (LIG) रुपये 9,00,000 रुपयांपर्यंत रुपये 7,50,000 पर्यंत 60 चौ. मि.पर्यंत
मध्यम उत्पन्न गट (MIG) रुपये 12,00,000 पर्यंत रुपये 12,00,000 पर्यंत 160 चौ. मि.पर्यंत
उच्च उत्पन्न गट (HIG) कमाल मर्यादा नाही कमाल मर्यादा नाही 200 चौ. मि.पर्यंत

हे पण वाचा : या टिप्स वापरा बोअरिंग रिलेशनशिपमध्ये येईल ताजेपणा

Simple Steps to Apply for Mhada Lottery

How to Apply for MHADA Lottery 2023

आधार कार्डला अर्जदारांचा मोबाइल नंबर जोडणे

सर्व अर्जदारांनी आपला अद्ययावत मोबाइल क्रमांक आपल्या आधार कार्डशी जोडून घेणे आवश्यक आहे. जर आधार कार्ड आपल्या मोबाइल क्रमांकाला जोडलेला नसेल तर आपल्या नजीकच्या आधार कार्ड नोंदणी केंद्रावर जाऊन तो जोडून घ्यावा.

आपल्याकडे अर्ज करण्यापूर्व सर्व कागदपत्रे असल्याचे सुनिश्चित करा

इच्छुक अर्जदारांनी, अर्ज करण्यापूर्वी पडताळणीकरीता आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करावे. सोडतीकरिता नोंदणी करण्यासाठी ही सर्व कागदपत्रे अर्जदाराला अपलोड करावी लागतील. आवश्यक कागदपत्रांची यादी खाली जोडल्याप्रमाणे आहे. 

मोबाइल उपयोजन (App) आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करावे

अर्जदारांनी गुगल प्ले स्टोअर (Play Store) किंवा अ‍ॅप स्टोअर (App Store) वरुन MHADA IHLMS 2.0 मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करावे.

नोंदणी प्रक्रिया

यशस्वीरित्या नोंदणी करण्याकरिता अर्जदाराला आपल्या कागदपत्रांची पडताळणी करुन घ्यावी लागेल. यशस्वी पडताळणीनंतर अर्जदाराचे प्रोफाइल तयार होईल आणि अर्जदाराला स्वयंघोषणा पत्रावर आधार ई-सही करावी लागेल. 

अर्ज करणे

नोंदणी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर पात्र अर्जदार म्हाडा मंडळ आणि त्यामध्ये असलेल्या सोडत योजना निवडून अर्ज करु शकतात. 

अनामत रक्कम आणि अर्ज शुल्क भरणे

अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्जदाराला अनामत रक्कम आणि अर्ज शुल्काचा भरणा करणे आवश्यक आहे. अर्जदार विविध पर्यायांचा जसे की, नेटबँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आरटीजीएस आणि एनईएफटी वापर करुन रक्कमेचा भरणा करु शकतात.

म्हाडा कोकण मंडळ लॉटरी 2023 ची संपूर्ण जाहिरात आणि बूकलेट PDF पाहण्यासाठी MHADA Konkan Booklet या लिंकवर क्लिक करा.

हे पण वाचा : जान्हवी कपूर स्वत:ला अशी ठेवते फिट, जाणून घ्या फिटनेस सीक्रेट

Important Documents to Apply for MHADA Lottery: म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 1. आधार कार्ड
 2. पॅन कार्ड
 3. आधार कार्डशी संलग्न मोबाइल क्रमांक
 4. अर्जदाराचा आधार कार्डवरील पत्ता हा सध्याच्या पत्त्यापेक्षा वेगळा असल्यास अशा अर्जदाराने सध्याचा पत्ता नोंदवावा
 5. तहसीलदार यांनी दिलेले अधिवास प्रमाणपत्र
 6. आयकर परतावा प्रमाणपत्र (ITR) वर्ष 2021 - 2022  किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा पुरावा वर्ष 2021-22 
  पती / पत्नीचा आयकर परतावा प्रमाणपत्र (ITR) वर्ष 2021-22 किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा पुरावा

हे पण वाचा : म्हणून लहान मुले माती किंवा खडू खातात

पात्रतेच्या अटी आणि शर्ती

अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे.

अर्जदार किंवा त्यांची पत्नी / पती किंवा त्यांची अज्ञान मुले यांच्या नावावर मालकी तत्त्वावर, भाडे खरेदी पद्धतीवर अथवा नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून अर्जदार ज्या महानगरपालिका / नगरपालिका / नगरपरिषद / ग्रामपंचायत (स्थानिक प्राधिकरण) हद्दीतील गृहनिर्माण योजनेमध्ये अर्ज करणार आहे त्या महानगरपालिका / नगरपालिका / नगरपरिषद / ग्रामपंचायत (स्थानिक प्राधिकरण) हद्दीतील म्हाडाने वितरीत केलेला किंवा खाजगीरित्या संपादित केलेला निवासी गाळा / निवासी भूखंड नसावा या संबंधीची म्हाडा विनियमातील तरतूद आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेकरिता अर्जदार किंवा त्यांची पत्नी / पती किंवा त्यांची अज्ञान मुले यांच्या नावावर मालकी तत्त्वावर, भाडे खरेदी पद्धतीवर अथवा नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून भारतामध्ये कोठेही पक्के घर नसावे.

अर्जदाराने जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग 20 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान 15 वर्षे सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र (Domicile Certificate) किंवा स्थानिक वास्तव्याचा दाखला संगणकीय प्रणालीद्वारे ग्राह्य ठरला जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी