MHADA Lottery 2023: म्हाडा लॉटरीची प्रतिक्षा संपली, कोकण मंडळाच्या 4752 घरांसाठी सोडतीचं वेळापत्रक जाहीर

ठाणे
सुनिल देसले
Updated Feb 23, 2023 | 16:26 IST

MHADA Lottery 2023 latest updates: सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून लवकरच घरांची सोडत जाहीर करण्यात येणार आहे.

MHADA Lottery 2023 online application form registration result dates announce by konkan mandal apply online mhada gov in and lottery mhada gov in
MHADA Lottery 2023: म्हाडा लॉटरीची प्रतिक्षा संपली, कोकण मंडळाच्या 4752 घरांसाठी सोडतीचं वेळापत्रक जाहीर (प्रातिनिधिक फोटो) 
थोडं पण कामाचं
  • म्हाडाच्या कोकण मंडळाकडून घरांसाठी सोडत
  • कोकण मंडळाच्या 4752 घरांसाठी म्हाडाकडून काढण्यात येणार लॉटरी
  • जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा

MHADA Konkan Mandal Lottery 2023 Dates: आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. याच हक्काच्या घराचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच (MHADA)कडून घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात येत आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातील 4752 घरांसाठी ही लॉटरी असणार आहे. या संदर्भातील तारखांची माहिती आता समोर आली आहे. (MHADA Lottery 2023 online application form registration result dates announce by konkan mandal apply online mhada gov in and lottery mhada gov in)

म्हाडाच्या कोकण मंडळातील घरांची सोडत कधी निघणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. कारण, म्हाडाने कोकण मंडळातील घरांच्या सोडतीच्या संदर्भातील तारखा जाहीर केल्या आहेत. येत्या 20 फेब्रुवारीपासून अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरू होणार आहे.

हे पण वाचा : पेनाच्या टोपणाला छिद्र का असतं? जाणून घ्या

सोडत कधी जाहीर होणार?

कोकण मंडळाकडून 4752 घरांसाठी सोडतीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, 20 फेब्रुवारी 2023 पासून अर्जविक्री आणि स्वीकृती सुरू होणार आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 20 मार्च असणार आहे. तर लॉटरीची सोडत 11 एप्रिल रोजी होणार आहे. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ही सोडत काढण्यात येईल. या संदर्भातील वृत्त लोकसत्ताने दिलं आहे.

हे पण वाचा : या कारणांमुळे होतो गर्भपात

Important dates for MHADA Lottery 2023: 

  1. अर्जाची नोंदणी - 5 जानेवारी 2023 पासून सुरू
  2. अर्ज विक्री - 20 फेब्रुवारी 2023 पासून
  3. अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 20 मार्च 2023
  4. स्वीकारलेल्या अर्जांची अंतिम यादी जाहीर - 5 एप्रिल 2023 
  5. सोडत कधी जाहीर होणार - 11 एप्रिल 2023

हे पण वाचा : स्वप्नदोषाच्या समस्येने त्रस्त आहात? मग हे ट्राय करा

कोणत्या योजनेत किती घरे? 

  1. पंतप्रधान आवास योजनेतील 984 घरे
  2. 20 टक्के योजनेतील 1 554 घरे
  3. म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 129 घरे 
  4. प्रथम येणाऱ्याला प्राधान्य तत्वावरील 2085 घरे 

हे पण वाचा : LIC पॉलिसीमध्ये मुलांच्या नावे 150 रुपये गुंतवा अन् मोठा परतावा मिळवा

कोणत्या विभागात किती घरे?

पंतप्रधान आवास योजनेतील अत्यल्प गटातील 340 घरे शिरढोण येथे, विरार-बोळिंज येथे 328 घरे, 256 घरे गोठेघर येथे, खोणी येथे 60 घरे अशी एकूण 984 घरे आहेत. या घरांच्या किमती 14 लाख 96 हजारांपासून ते 21 लाख याच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी