MHADA Konkan Lottery 2023: म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ, जाणून घ्या काय आहे शेवटची तारीख

MHADA Konkan Lottery date extended : म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीत नवीन संगणकीय प्रणालीतील अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेत वापरकर्त्यांना अनुकूलतेसाठी काही महत्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे अनेक अर्जदारांना अर्ज सादर करण्यात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं समोर येत आहे.

mhada lottery 2023 submission online form last date increased to 19 april 2023 check latest updates housing mhada gov in lottery mhada gov in
MHADA Konkan Lottery 2023: म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ, जाणून घ्या काय आहे शेवटची तारीख (Photo: housing.mhada.gov.in) 
थोडं पण कामाचं
  • म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
  • अर्जदाराकडे पीएमएवाय नोंदणी प्रमाणपत्र असणे आता बंधनकारक नाही. हे प्रमाणपत्र सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी मिळवणे गरजेचे असणार
  • म्हाडा घरांसाठी लॉटरीची ऑनलाईन सोडत 10 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे होईल

MHADA Konkan Lottery 2023 latest updates read in marathi : म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ठाणे, पालघर जिल्ह्यात विविध गृहनिर्माण योजने अंतर्गत घर आणि भूखंड विक्री करण्यासाठी लॉटरी जाहीर केली आहे. यामध्ये 4640 घरांचा आणि 14 भूखंडांचा समावेश आहे. या लॉटरीसाठी अर्ज करण्यास 8 मार्च 2023 पासून सुरुवात झाली असून शेवटचा दिवस 10 एप्रिल 2023 होता. मात्र, आता अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता 19 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येऊ शकतात.

21 एप्रिल 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन व आरटीजीएस / एनइएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे. कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे म्हणाले की, अधिकाधिक अर्जदारांना अर्ज करता यावे, यासाठी सुविधा म्हणून IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management system) या नूतन संगणकीय प्रणालीतील अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेत वापरकर्त्यांना अनुकूलतेसाठी काही महत्वाचे बदल केले आहेत.

हे पण वाचा : ही औषधी वनस्पती घशाच्या समस्यांवर रामबाण उपाय

PM आवास योजनेचे प्रमाणपत्र आता बंधनकारक नाही

या नवीन बदलानुसार सोडतीतील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे पीएमएवाय नोंदणी प्रमाणपत्र असणे आता बंधनकारक नाही. हे प्रमाणपत्र सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी मिळवणे गरजेचे आहे. या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेअंतर्गत 984 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

हे पण वाचा : भुवयांचे केस का गळतात?

या सोडतीत अर्जदाराचे उत्पन्न दर्शविण्यासाठी आयकर परतावा प्रमाणपत्र (Income Tax Return certificate) प्रणालीमध्ये अपलोड करावे लागते. हे प्रमाणपत्र अपलोड केल्यावर प्रणाली Optical Character Recognition करून पोचपावतीचा क्रमांक, एकूण उत्पन्न, मूल्यांकन वर्ष व नाव या बाबी तपासते. मात्र, अर्जदारांनी अस्पष्ट, चुकीचे आयकर परतावा प्रमाणपत्र अपलोड केल्यामुळे अर्जदाराचे उत्पन्न निश्चितीस अडचणी येत होत्या. त्यामुळे आता अर्जदाराने आयकर परतावा प्रमाणपत्र प्रणालीमध्ये अपलोड केल्यावर अर्जदाराचे एकूण उत्पन्न, मूल्यांकन वर्ष व नाव या बाबतची माहिती एका चौकटीत (Pop Up) दर्शविली जाणार आहे. ही माहिती अचूक असल्यास अर्जदाराकडून चेक बॉक्समध्ये संमती घेतली जाणार आहे. मात्र, या माहिती प्रणालीत अपलोड केलेल्या आयकर परतावा प्रमाणपत्रातील माहितीशी जुळत नसल्यास अर्जदाराला या माहितीत सुधारणा / बदल करण्याची सुविधाही आता प्रणालीत देण्यात आली आहे. हा चेक बॉक्स तपासल्याशिवाय अर्जदाराला अर्ज भरणा करण्याविषयीची पुढील प्रक्रिया करता येणार नाही.

हे पण वाचा : रिफाईंड तेलामुळे होतात हे आजार, तुम्ही सुद्धा वापरता?

महिला अर्जदारांना नवीन पर्याय

या प्रणालीत नोंदणी करताना महिला अर्जदारांना विवाहानंतरचे नाव, आडनाव बदलल्यामुळे किंवा इतर कारणामुळे येणाऱ्या अडचणी विचारात घेता अर्ज नोंदणी प्रणालीच्या पानावर आता नवीन पर्याय अर्जदाराला देण्यात आला आहे. या पर्यायानुसार अर्जदार दुसऱ्या नावाने ओळखला जात असल्यास त्याचा होकार किंवा नकार घेतला जाणार आहे. अर्जदाराने होकार लिहिल्यास अर्जदाराने त्याचे दुसरे नाव नमूद करावयाचे आहे. या सुविधेमुळे विवाहानंतरचे नाव, आडनाव बदललेल्या अर्जदारांना नोंदणी करता येणार आहे.

'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या योजनेतील यशस्वी विजेत्यांनी मंडळातर्फे प्रथम सूचना पत्र (Provisional Offer Letter) जारी करण्याच्या अगोदर सदनिका नाकारली, तर सदनिका परत करणार्‍या विजेत्यांची अनामत रक्कम परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, प्रथम सूचना पत्र प्राप्त झाल्यानंतर विजेत्या अर्जदाराने सदनिका नाकारल्यास सदनिकेच्या एकूण विक्री किंमतीच्या एक टक्के रक्कम कपात करुन अर्जदाराला अनामत रक्कम परत केली जाणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 2048 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांनी दिली.

हे पण वाचा : गर्भवती महिलांनी डाळिंब खाण्याचे असंख्य फायदे

ऑनलाईन लॉटरी कधी आणि कुठे होणार?

  1. मंडळातर्फे सदनिका व भूखंड विक्रीसाठी ऑनलाईन संगणकीय सोडत 10 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे. 
  2. सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी 4 मे 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे.
  3. 10 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार आहे.
  4. अर्जदारांना सोडतीचा निकाल तत्काळ मोबाइलवर एसएमएस द्वारे, ई-मेल द्वारे तसेच अ‍ॅपवर प्राप्त होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी