आधारवाडी कारागृहातील कॉन्स्टेबलची मुलगी बनली “मीस इंडिया ग्लोबल”

ठाणे
भरत जाधव
Updated May 16, 2022 | 21:27 IST

लेटीका आयोजित मिस इंडिया ग्लोबल या वाशीमध्ये झालेल्या स्पर्धेत कल्याणातील भूमिका सावंत या तरुणीने मिस इंडिया ग्लोबलच्या मुकुटावर स्वताचे नाव कोरले. तिची इको टुरिझम नायजेरिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

The constable's daughter became Miss India Global
कॉन्स्टेबलची मुलगी बनली “मीस इंडिया ग्लोबल  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • भूमिकाचे वडील विठ्ठल सावंत हे आधारवाडी कारागृहातील कॉन्स्टेबल आहेत.
  • भूमिकाला लहानपणापासून नृत्य आणि अभिनयाची आवड

कल्याण : टॅँलेटीका आयोजित मिस इंडिया ग्लोबल या वाशीमध्ये झालेल्या स्पर्धेत कल्याणातील भूमिका सावंत या तरुणीने मिस इंडिया ग्लोबलच्या मुकुटावर स्वताचे नाव कोरले. तिची इको टुरिझम नायजेरिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कॉन्स्टेबल असलेल्या विठ्ठल सावंत यांची भूमिका ही धाकटी मुलगी. लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड असलेली भूमिका ८ वीत असताना नृत्य सादरीकरण करताना टँलेटीका सर्च या संस्थेने हेरले. यानंतर तिचे प्रशिक्षण सुरू झाले. 

वेगवेगळ्या टप्प्यावर प्रशिक्षण घेतानाच तिने आपले शिक्षण सुरू ठेवले. मागील वर्षी झालेल्या बारवीच्या परीक्षेत तिला ७० टक्के मार्क्स मिळाले असून एकीकडे अभ्यास आणि जिम, ग्रुमिंग, डाएटीग सेशनवर लक्ष केंद्रित करतानाच भूमिकाने या स्पर्धेला सामोरी जाण्याची तयारी केली होती. अशा दोन कोणत्या गोष्टी आहेत, ज्या एखाद्याला सर्वश्रेष्ठ मॉडेल बनविण्यासाठी आवश्यक आहेत, या प्रश्नावर उत्तर देताना तितकीच प्रगल्भता दाखवत  भूमिका हिने आत्मविश्वास महत्वाचा आहे. 
अति आत्मविश्वास नसावा मात्र आत्मविश्वासाच्या जोरावर अशक्य ते शक्य करता येते आणि त्याच्याच जोडीला दुसऱ्याला कमी न लेखता प्रत्येकात एक वेगळेपण आहे हे लक्षात घेत आपल्या स्पर्धकाला आपल्या पेक्षा कमी लेखण्याचा प्रयत्न न करणे हीच चांगल्या मॉडेलची वैशिष्ट्य असल्याचे तिने सांगत उपस्थिताची दाद मिळवली.

भूमिका हिने वाशी येथे रंगलेल्या स्पर्धेत मिस महाराष्ट्र म्हणून सहभागी झाली होती. इतर 24 स्पर्धकामधून (12 तरुण 12 तरुणी) मधून तिची मिस इंडिया ग्लोबल या किताबासाठी निवड केली. या किताबाच्या अंतर्गत भूमिकाचा “ मिस इको टुरिझम नायजेरिया” या स्पर्धेतील सहभाग निश्चित झाला आहे. तिच्या या यशानंतर तिच्या आई-वडिलाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आपण इतकी वर्षे केलेल्या मेहनत आई वडिलाकडून मिळालेले प्रोत्साहन यामुळेच आपण आत्मविश्वासाने या स्पर्धेला सामोरी जात यशाला गवसणी घातली असून मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे आपले स्वप्न असल्याचे ती सांगते.दरम्यान भूमिका हिला मिळालेल्या यशानंतर आधारवाडी कारागृहाचे अधीक्षक अ सा सदाफुले यांनी तिची तिच्या राहत्या घरी भेट घेत तिला पुढील वाटचालीसाहती शुभेच्छा दिल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी