मनसेच्या कार्यालयावर दगडफेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून , मनसेचा आरोप 

MNS party office attacked । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर आता मुंब्र्यात मनसेच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. ही दगडफेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप मुंब्राचे मनसे वाहतूक शाखा अध्यक्ष इरफान सय्यद यांनी केला आहे. 

MNS alleges stone-throwing at MNS office by NCP workers
मनसेच्या कार्यालयावर दगडफेक राष्ट्रवादीकडून  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर आता मुंब्र्यात मनसेच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे.
  • ही दगडफेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप मुंब्राचे मनसे वाहतूक शाखा अध्यक्ष इरफान सय्यद यांनी केला आहे. 
  •  या मनसेच्या फलकावर दगड मारून फडतानाचे दृश्य सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे.

MNS party office attacked ।   मुंब्रा :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर आता मुंब्र्यात मनसेच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. ही दगडफेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप मुंब्राचे मनसे वाहतूक शाखा अध्यक्ष इरफान सय्यद यांनी केला आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्यानंतर मुंब्र्यातील तन्नवर नगर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन दिवसांपूर्वी मनसेच्या वाहतूक सेना 'राजगड' या कार्यालयाचा पक्षाचा लावलेला फलक उतरवण्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत कालावधी दिला होता. फलक न काढल्यास आम्ही आमच्या पद्धतीने फलक काढू मग कोणतीही कारवाई झाली तरी चालेल असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अय्याज बबलू यांनी दिला होता.

 या प्रकरणी मुंब्राचे मनसे वाहतूक शाखा अध्यक्ष इरफान सय्यद यांनी मनसे वरिष्ठ पदाधिकारी आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सतर्कता दाखवत मनसे वाहतूक शाखा या कार्यालयाच्या ठिकाणी कडक बंदोबस्त लावला होता.

 तसेच राष्ट्रवादीच्या संबंधीत कार्यकर्त्यांना १४९ अंतर्गत नोटीस देखील बजावल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मनसेचा हा फलक उतरवता आला नव्हता. मात्र वातावरण शांत झाल्यानंतर पोलिसांची पाठ फिरताच काही अज्ञात इसमांनी दगड मारून हा मनसे पक्षाचा फलक फाडण्यात आला आहे.

 
 
 या मनसेच्या फलकावर दगड मारून फडतानाचे दृश्य सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. हा फलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडांनी म्हणजेच अयाज बबलू यांनी फाडला असल्याचा आरोप यावेळी मनसे वाहतूक शाखेचे मुंब्रा अध्यक्ष इरफान सय्यद यांनी केला आहे. 
 
 दोन दिवसांपूर्वी अय्याज बबलू यांनी मनसेचा हा फलक उतरवण्यासाठी धमकी देत फलक न उतरल्यास आम्ही आमच्या स्टाईल ने फलक उतरवू असा इशारा दिला होता. या प्रकरणी प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास असून मनसे ही गुंडागर्दी खपून घेणार नाही. तसेच कोणतं इतकी हिम्मत नाही की मनसेचे ऑफिस बंद करेल.. 
 
 सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत त्यानुसार राज ठाकरे यांनी देखील भोंग्यांना विरोध केला आहे, नमाज पठण करण्यासाठी नाही. आपण स्वतः जातिवंत मुस्लिम असून आम्ही मनसे सोबत आणि राज ठाकरे यांच्या सोबत ठाम असल्याचे मत यावेळी मनसे वाहतूक शाखेचे मुंब्रा अध्यक्ष इरफान सय्यद यांनी मांडले.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी