MNS: शिंदे सरकारला मतदान करणाऱ्या मनसेच्या आमदाराची मुख्यमंत्री शिंदेंवरच टीका

MNS MLA Raju Patil Criticized CM Shinde: मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पाहा राजू पाटील नेमकं काय म्हणाले.

mns mla raju patil who voted for shinde government criticizes chief minister eknath shinde
MNS: शिंदे सरकारला मतदान करणाऱ्या मनसेच्या आमदाराची मुख्यमंत्री शिंदेंवरच टीका 
थोडं पण कामाचं
  • मनसेच्या आमदाराची मुख्यमंत्री शिंदेवर टीका
  • कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यावरुन राजू पाटील सरकारवर संतापले
  • मुख्यमंत्री शिंदेंना मतदान करण्याऱ्या राजू पाटलांची शिंदेंवरच टीका

Raju Patil MNS: कल्याण: त्र्यंबकेश्वर येथील सावरपाड्यात एक पूल गेल्या वर्षी उभारण्यात आला होता. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पुढाकार घेऊन हा पूल उभारलेला होता. पण गेल्याच आठवड्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात हा पूल वाहून गेला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा आदिवासी महिलांना 30 फूट खोल असलेल्या तास नदीवरुन रोज पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या सगळ्यावरुन मनसेचे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला तर लगावला आहेच. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सरकारवर देखील टीका केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याच राजू पाटील यांनी विधानसभेत शिंदे सरकारच्या बाजून मतदान केलं आहे. (mns mla raju patil who voted for shinde government criticizes chief minister eknath shinde)

माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी गेल्या वर्षी प्रशासनाला आदेश देऊन पूल उभारण्यास सांगितलं होते. त्यानंतर प्रशासनाने हा पूल दोन उभारला होता. त्यामुळे आदिवासी महिलांची वाट सोपी झाली होती. त्यावेळी या पुलाची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. मात्र काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने या पुलाला मोठा पूर आल्याने हा संपूर्ण पूल वाहून गेला. 

अधिक वाचा: नीरव मोदीची हॉंगकॉंगमधील 253 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

त्यावरुन आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगवला आहे. 'जो तात्पुरता प्रयोग होता, तो चांगला होता. मात्र त्याला जी प्रसिद्धी देण्यात आली होती त्या अनुषंगाने त्याचा फॉलो अप घेणे गरजेचे होते. त्या पुलाचे पुढील काहीही काम न करता त्याला तसंच वाऱ्यावर सोडून दिलं. या पुलाची दूरवस्था झाली असून एखादी महिला त्यामध्ये पडून जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपयोजना केली पाहिजे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टास्क फोर्स काम करताना दिसत नाही.' असं म्हणत राजू पाटलांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. 

राज्यात सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व शासकीय यंत्रणांना लवकरात लवकर सर्व भागातील खड्डे हे बुजवावे अशा सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर या कामावर लक्ष देण्यासाठी मुख्यमंत्री यांनी टास्क फोर्स उभा केला आहे. मात्र खड्ड्यांच्या विषयावर राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त करत त्यांचा टास्क फोर्स काम करताना दिसून येत नसल्याचं म्हटलं आहे.

अधिक वाचा: बंडखोर आमदाराचा उद्धव ठाकरेंवर प्रचंड खळबळजनक आरोप

'मी परवा केडीएमसीच्या आयुक्तांना भेटलो. त्यावेळी एमएमआरडीए, एमएमआरडीसी आणि पीडब्ल्यूडी ही जबाबदारी आमची नाही. असं आयुक्तांनी सांगितलं. यासाठी टास्क फोर्स तयार केल्या आहेत आणि त्यांना सांगण्यात आले आहे की खड्डे भरावे. पण तसं काहीही होताना दिसत नाही. त्यामुळे येथील रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत.' असंही राजू पाटील म्हणाले.  

कुशवली धरण प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राजू पाटलांनी केलं कौतुक: 

कुशवली धरण प्रकरणी एमएमआर रिजनसाठी एक स्वतःच धरण पाहिजे. आता जी पाणीटंचाई सुरू आहे भविष्यात ती वाढू शकते. त्यामुळे कुठेतरी सकारात्मक पाऊल मुख्यमंत्र्यांनी उचलले आहे. त्याचे स्वागत केलं पाहिजे. असं आमदार राजू पाटील यावेळी म्हणाले.

अधिक वाचा: CBSE बोर्डाच्या १०वीचा निकाल जाहीर, या लिंकवर पाहा मार्क्स 

कल्याण-डोंबिवली मध्ये उद्या होणार महासंवाद यात्रेची सांगता 

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी महासंवाद दौरा सुरू केला आहे. या संवाद यात्रेची सांगता ही उद्या कल्याण-डोंबिवलीमध्ये होणार आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेची ताकद मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मोठ्या थाटामाटात हा जल्लोष होणार असल्याचं सांगितलं. 

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडीमध्ये नागरिक त्रस्त झाले आहेत. सर्व नागरिक या राजकारणाला कंटाळले आहेत. त्याच्यामुळे तरुण वर्ग हा मनसेमध्ये प्रवेश करत आहेत असे देखील राजू पाटील यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी