mohit kamboj comment on jitendra awhad former police boduguard vaibhav kadam suicide : कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळचे पोलीस बॉडीगार्ड वैभव शिवाजी कदम बुधवारी (29 मार्च 2023) मृतावस्थेत सापडले. पोलिसांच्या सुरक्षा विभागात कार्यरत हेड कॉन्स्टेबल वैभव शिवाजी कदम यांनी आत्महत्या केली. पण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप भाजपच्या मोहित कंबोज भारतीय यांनी केला. यामुळे वैभव कदम यांच्या आत्महत्येच्या मुद्यावरून नवे राजकारण सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वैभव कदम यांच्या आत्महत्येप्रकरणी एफआयआर नोंदवा. या प्रकरणाचा सखोल तपास करा, अशी मागणी भाजपच्या मोहित कंबोज भारतीय यांनी केली आहे. त्यांनी ही मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाहीरपणे केली आहे. ट्वीट करून मोहित कंबोज भारतीय यांनी त्यांची मागणी जाहीर केली आहे. आमचे रक्षण करणारे पोलिसच सुरक्षित नसतील किंवा त्यांना न्याय मिळत नसेल तर जनतेचे काय होणार? असा सवाल मोहित कंबोज भारतीय यांनी केला.
जितेंद्र आव्हाड राज्याचे कॅबिनेट मंत्री असताना हेड कॉन्स्टेबल वैभव शिवाजी कदम त्यांचे पोलीस बॉडीगार्ड म्हणून कार्यरत होते. याच काळात अनंत करमुसे यांची एक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली. या प्रकरणात काही पोलीस अंगरक्षकांसह आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी करमुसे यांना मारहाण केली होती. करमुसे यांच्या तक्रारीनंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात वैभव कदम यांचीही चौकशी सुरू होती.
करमुसे प्रकरणात वारंवार चौकशीसाठी बोलावून त्रास दिला जातोय, असे कदम यांचे म्हणणे होते. त्यांनी 'पोलीस आणि मीडियाला एकच विनंती आहे, मी आरोपी नाही' असे व्हॉट्सअप स्टेटस ठेवत आत्महत्या केली. या प्रकरणात मोहित कंबोज भारतीय यांच्या ट्वीटमुळे चर्चेला उधाण आले आहे.
अनोखा रेल्वे ट्रॅक जिथे चहुबाजूने येतात Train पण नाही होत Accident