माउंट एव्हरेस्टवरून उतरताना राज्यातील २ गिर्यारोहकांचा मृत्यू, आतापर्यंत ८ भारतीयांचा गेला जीव

ठाणे
Updated May 25, 2019 | 13:18 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

जगातील सर्वात उंच शिखर चढण्याचा प्रयत्न करताना आतापर्यंत ८ भारतीय गिर्यारोहकांचा मृत्यू झालाय. खराब वातावरणामुळे राज्यातील २ गिर्यारोहकांचा गुरूवारी मृत्यू झालाय. त्यातील राज्यातील दोघांचा समावेश आहे.

Mount Everest
एव्हरेस्टवरुन उतरतांना राज्यातील २ गिर्यारोहकांचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • एव्हरेस्ट सर करुन उतरणाऱ्या महाराष्ट्रातील दोन गिर्यारोहकांचा मृत्यू
  • आतापर्यंत एकूण ८ भारतीयांनी गमावला जीव
  • बुधवारी एका ६५ वर्षीय र्ऑस्ट्रेलियन गिर्यारोहकाचाही मृत्यू
  • या मोसमात जगातील एकूण १६ गिर्यारोहकांनी गमावला जीव

मुंबई: राज्यातील गिर्यारोहकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. माऊंट एव्हरेस्ट यशस्वीपणे सर केल्यानंतर उतरताना राज्यातील दोन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशातील ८ गिर्यारोहकांचा या आरोहणात मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. ठाण्यातील अंजली कुलकर्णी (५३ वर्षे) आणि अकलूज इथले निहाल बागवान (२७) मृत्युमुखी पडले आहेत. मृत्यू झालेल्या गिर्यारोहकांमध्ये एका ऑस्ट्रेलियन गिर्यारोहकाचाही समावेश आहे.

निहाल बागवान हे द्विसदस्यीय गिर्यारोहण टीमचे प्रमुख होते. हिमालय टाइम्सनुसार शेरपा यांनी दिलेल्या माहितीनुसार, निहाल यांची माउंट एव्हरेस्टहून परत येत असताना बाल्कनी क्षेत्राजवळ तब्येत बिघडली आणि चौथ्या बेस कॅम्प शिबीरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर ८३०० मीटर उंचीवर असताना अंजली कुलकर्णी यांना त्रास सुरू झाला आणि तिथंच त्यांचा मृत्यू झाला. या दोन्ही गिर्यारोहकांनी शिखरमाथ्यावर २३ मे रोजी सकाळी यशस्वी आरोहण केलं होतं.

या दोघांचे मृतदेह अजूनही २६ हजार फूट उंचीवर आहे. तिथून ते परत आणण्याची बचाव मोहीम शनिवारी म्हणजे आजपासून सुरू झाल्याची माहिती मिळतेय. विशेष म्हणजे ठाण्याच्या अंजली कुलकर्णी यांनी यापूर्वीही अनेक शिखरं सर केली आहेत. एव्हरेस्ट सर करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. यात त्यांचे पती शरद कुलकर्णी हे देखील सोबत होते. दोघांनी एकत्र एव्हरेस्ट सर केला आणि परतत असताना ही दुर्घटना घडली. शरद कुलकर्णी यांनाही फ्रॉस्टबाइट म्हणजेच हिमदंशाचा त्रास झाला असून त्यांना काठमांडूला नेण्यात आलं आहे.

‘एव्हरेस्टवरील गिर्यारोहणासाठीचं योग्य वातावरण आता फक्त २७ मेपर्यंतच आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या गिर्यारोहकांचे मृतदेह या दोन दिवसांमध्येच परत आणणं गरजेचं आहे. त्यानंतर तिथं जाता येणं अशक्य आहे, ही माहिती काठमांडू इथं असलेले कांचनजंगा मोहिमेचे नेते आणि एव्हरेस्टवीर उमेश झिरपे यांनी दिलीय.

गेल्या काही वर्षांत सर्वोच्च हिमशिखरावर आरोहणा दरम्यान विक्रम करण्याची गर्दी वाढली आहे. त्यामुळेच होणाऱ्या दुर्घटनाही वाढल्या आहेत. आतापर्यंत या मोसमात ८ भारतीय गिर्यारोहकांचा मृत्यू झालाय. तर ६५ वर्षीय ऑस्ट्रेलियन गिर्यारोहत इंग लांडग्राफ यांचाही बुधवारी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनं विविध शिखरांवर मृत्यूमुखी पडलेल्या गिर्यारोहकांची एकूण संख्या १६ झालीय. त्यातील आठ जण भारतीय आहेत.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
माउंट एव्हरेस्टवरून उतरताना राज्यातील २ गिर्यारोहकांचा मृत्यू, आतापर्यंत ८ भारतीयांचा गेला जीव Description: जगातील सर्वात उंच शिखर चढण्याचा प्रयत्न करताना आतापर्यंत ८ भारतीय गिर्यारोहकांचा मृत्यू झालाय. खराब वातावरणामुळे राज्यातील २ गिर्यारोहकांचा गुरूवारी मृत्यू झालाय. त्यातील राज्यातील दोघांचा समावेश आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
 साताऱ्यात भाजप आणि राजेंना धक्का देण्याचा पवारांचा 'गेम' प्लान, राष्ट्रवादीत होणार इनकमिंग 
साताऱ्यात भाजप आणि राजेंना धक्का देण्याचा पवारांचा 'गेम' प्लान, राष्ट्रवादीत होणार इनकमिंग 
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १९ सप्टेंबर २०१९: 'गेम प्लॅन' ते हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १९ सप्टेंबर २०१९: 'गेम प्लॅन' ते हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
[VIDEO]: मुंबईत गॅस गळतीच्या तक्रारी, नागरिकांमध्ये घबराट
[VIDEO]: मुंबईत गॅस गळतीच्या तक्रारी, नागरिकांमध्ये घबराट
मनसेचे ठरलंय,  इतक्या जागांवर लढविणार विधानसभा निवडणूक?
मनसेचे ठरलंय,  इतक्या जागांवर लढविणार विधानसभा निवडणूक?
[VIDEO]: मुंबईत इमारतीचा काही भाग कोसळला, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी
[VIDEO]: मुंबईत इमारतीचा काही भाग कोसळला, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी
अमित शहांच्या उपस्थितीत भाजपची पुन्हा मेगाभरती, युतीवरही होणार अंतिम निर्णय
अमित शहांच्या उपस्थितीत भाजपची पुन्हा मेगाभरती, युतीवरही होणार अंतिम निर्णय
मुरबाडमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, भीषण अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू
मुरबाडमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, भीषण अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू
तयार रहा, आज दुपारी 12 वाजता होणार निवडणुकांची घोषणा
तयार रहा, आज दुपारी 12 वाजता होणार निवडणुकांची घोषणा