Ketaki Chitale : केतकी चितळेच्या घरात पोहोचले गुन्हे शाखेचे पोलीस, लॅपटॉपट आणि इतर साहित्य केले जप्त

ठाणे
तुषार ओव्हाळ
Updated May 17, 2022 | 12:44 IST

शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली आहे. आता पोलीस केतकीच्या घरी पोहोचले असून त्यांनी लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केले आहे. केतकीने केलेल्या पोस्टमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ketaki chitale home
केतकी चितळेच्या घरात पोहोचले गुन्हे शाखेचे पोलीस  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली आहे.
  • आता पोलीस केतकीच्या घरी पोहोचले असून त्यांनी लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
  • केतकीने केलेल्या पोस्टमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Ketaki Chitale : ठाणे : शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली आहे. आता पोलीस केतकीच्या घरी पोहोचले असून त्यांनी लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केले आहे. केतकीने केलेल्या पोस्टमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

मराठी अभिनेत्री केतकी चितळेने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात अश्लाघ्य भाषेत एक पोस्ट लिहिली होती. त्यात शरद पवार यांची नरक वाट पाहत आहे असे म्हटले होते. या प्रकरणी केतकी विरोधात ठाण्यासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

 
तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे... Posted by Ketaki Chitale on Friday, May 13, 2022

ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी केतकीला अटक केली आणि कोर्टात हजर केले. तेव्हा कोर्टाने केतकीला पोलीस कोठडी सुनावली आहे. 
आता ठाणे आणि नवी मुंबई पोलीस केतकीच्या घरी पोहोचले होते. त्यांनी केतकीच्या घरची झडती घेतली असून लॅपटॉप, मोबाईल आणि इतर साहित्य जप्त केल आहेत. केतकीने केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये आणखी कुणाचा समावेश आहे का? यात केतकीला आणखी कुणी मदत केली का याचा शोध पोलीस घेत आहेत. केतकी विरोधात पाच जिल्ह्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच केतकीला आता महाराष्ट्र दर्शन घडवणार असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिला आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी