Narayan Rane : ....तेव्हा का काढली नाही?, नारायण राणे यांचा सवाल

Bharat jodo yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून पुढे जातेय. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेय. भाजप, मनसे आणि शिंदे गट आक्रमक होऊन रस्त्यावर उतरलेय.

Narayan Rane criticizes Rahul Gandhi and Aditya Thackeray
Narayan Rane : ....तेव्हा यात्रा का काढली नाही?, नारायण राणे यांची बोचरी टीका  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रा बुलढाण्यात
  • सावरकरांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याने भाजप आक्रमक
  • नारायण राणेंनी राहुल गांधी व आदित्य ठाकरेंवर घेतले तोंड सुख

ठाणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून पुढे जातेय. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजप, मनसे आणि शिंदे गट आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले असून भारत जोडो यात्रा रोखण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधलाय. ते डोंबिवलीत सावंत हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आले होते. (Narayan Rane criticizes Rahul Gandhi and Aditya Thackeray)

अधिक वाचा : "ओमराजे निंबाळकर नाटकी माणूस", स्व पवनराजे निंबाळकरांच्या सोबत्यांनी ओमराजेंवर केली सडकून टीका

नारायण राणे म्हणाले, एवढ्या वर्ष काँग्रेस सत्तेत असतानाही भारत जोडो यात्रा काढावी वाटली नाही. भारत जोडो यात्रेत तीच तीच लोक दिसतात नवे लोक सहभागी होत नाहीत. ही यात्रा म्हणजे काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची एकत्र यात्रा असल्याने त्याला लोकांची प्रतिसाद मिळणार नाही.

अधिक वाचा : Bharat Jodo Yatra राहुल गांधींच्या जाहीर सभेत मनसे दाखवणार काळे झेंडे, नाना पटोले म्हणाले....

याच भारत जोडो यात्रेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे सहभागी झाल्याने त्यांची खिल्ली उडवण्यात आली. राणेंनी सांगितले की, आदित्य ठाकरे यांचे राहुल गांधीच्या भारत जोडोला फक्त फोटो काढण्यासाठी उपस्थिती होती. आदित्य ठाकरे बालिश आहे. बाळासाहेब ठाकरे हे सावरकरांना का मनात होते, हे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना माहिती नाही, त्यांना त्याचा गंध नाही. सावरकरांबद्दल राहुल गांधी बोलले याची आदित्य आणि उद्धव ठाकरे यांना दोघांना चीड आली नाही, असाही आरोप नारायण राणेंनी केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी