Mumbai Metro News:  नवी मुंबईकरांना मेट्रोसाठी आणखी पहावी लागणार वाट, राज्यातील राजकीय परिस्थितीमुळे होतोय विलंब

ठाणे
तुषार ओव्हाळ
Updated Aug 07, 2022 | 17:03 IST

राज्यातील बदलत्या राजकारणाचा फटका नवी मुंबईकरांना बसणार आहे. १५ ऑगस्ट रोजी नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन होणार होते. परंतु ते आता पुन्हा पुढे ढकलण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना मेट्रोतून प्रवास करण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.

navi mumbai metro
नवी मुंबई मेट्रो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यातील बदलत्या राजकारणाचा फटका नवी मुंबईकरांना बसणार आहे.
  • १५ ऑगस्ट रोजी नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन होणार होते.
  • परंतु ते आता पुन्हा पुढे ढकलण्यात येणार आहे.

Navi Mumbai Metro :  ठाणे : राज्यातील बदलत्या राजकारणाचा फटका नवी मुंबईकरांना (Navi Mumbai) बसणार आहे. १५ ऑगस्ट रोजी नवी मुंबई मेट्रोचे (Nave Mumbai Metro) उद्घाटन होणार होते. परंतु ते आता पुन्हा पुढे ढकलण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना मेट्रोतून प्रवास करण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे. (navi mumbai metro inauguration delay due to maharashtra cabinet expansion)

अधिक वाचा : Sanjay Raut: 'मुंबईत गुजराती कधी आले?', ईडीच्या कोठडीत बसून राऊतांचा 'रोखठोक' लेख

नवी मुंबई मेट्रोच्या पाच किमीचा पहिला टप्पा पेंधर रोड ते तळोजा सेंट्रल पार्क पर्यंत आहे. १५ ऑगस्ट रोजी उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्य हस्ते या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार होते. परंतु आता ही तारीख पुन्हा पुढे ढकलण्यात येणार आहे.

अधिक वाचा :  Maharashtra Rains: पुढील 4 दिवस पाऊस पुन्हा झोडपणार, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. गेल्या महिन्याभरापासून शिंदे आणि फडणवीस यांच्या दिल्लीवार्‍या सुरू आहेत, परंतु अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेली नाही. मंत्रिमंडळ विस्तारानांतर १५ ऑगस्टला नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन होणार होते. परंतु अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त न मिळाल्याने नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन रखडले आहे. राज्यातील या राजकारणामुळे नवी मुंबईकरांना नाहक फटका बसत आहे.

अधिक वाचा : नागपूर विमानतळावर मोठी दुर्घटना !, वीज पडल्याने दोन विमान अभियंते जखमी

असे असले तरी एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मुख्यमंत्री राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रिवास्तव यांनी कॅबिएट आणि राज्य मंत्र्यांचा अधिकार विभागाच्या सचिवांकडे सोपवण्याचा आदेश जारी केला आहे.

अधिक वाचा : 166 नंबर ती मिसिंग गर्ल..., 9 वर्षांनंतर अपहरणकर्त्यांच्या तावडीतून ॲना बनून आली

प्रवाशांच्या प्रतीक्षेत मेट्रो

सिडकोने नवी मुंबई मेट्रोचे बांधकाम केले आहे. ही मेट्रो एक पेंधर रोड ते बेलापूर पर्यंत  ११.१ किमीची आहे. या मार्गावर ११ मेट्रो स्थानकं आहेत. याचा पहिला टप्पा ५.१४ किमी असून त्यात ५ मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. या मार्गावरील खारघरच्या सेंट्रल पार्क ते तळोजाच्या पेंधर रोडपर्यंत संपूर्ण काम झाले आहे. आता फक्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मेट्रोचे उद्घाटन बाकी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी