धक्कादायक! वडिलांनी बाईक देण्यास नकार दिल्याने तरुणाने घेतलं स्वत:ला पेटवून 

ठाणे
Updated Nov 16, 2019 | 20:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Navi Mumbai collegian sets self on fire: वडिलांनी बाईक न दिल्याने एका कॉलेज विद्यार्थ्याने स्वत:ला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील कळंबोली परिसरात ही घटना घडली आहे. 

navi mumbai youth sets self fire ablaze father denied bike kalamboli maharahshtra news marathi
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • वडिलांनी बाईक न दिल्याने विद्यार्थ्याने स्वत:ला पेटवलं
  • गंभीर जखमी विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरु
  • नवी मुंबईतील धक्कादायक घटना

नवी मुंबई: आपल्या वडिलांनी बाईक दिली नाही म्हणून रागाच्या भरात एका १७ वर्षीय तरुणाने स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील कळंबोली येथे राहणारा हा तरुण इयत्ता ११वीमध्ये शिकत आहे. शुक्रवारी वडिलांनी बाईक देण्यास नकार दिल्याने त्याला राग आला. रागाच्या भरात तो कॉलेजमध्ये गेला यानंतर त्याने आपल्या वर्गात प्रवेश करण्याऐवजी बाथरूममध्ये गेला. बाथरूममध्ये गेल्यावर त्याने स्वत:ला पेटवून घेतले.

शुक्रवारी सकाळी या तरुणाने कॉलेजमधील बाथरूममध्ये त्याने स्वत:ला पेटवून घेतलं. यानंतर तो पेटलेल्या अवस्थेत बाथरूममधून बाहेर पडला. यावेळी शिक्षकांनी आग विझवली आणि त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या तरुणावर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्याचे वडील पोलीस खात्यात कार्यरत आहेत. त्याच्या वडिलांनी सांगितले की, त्याला खूप राग येतो, त्याला कॉलेजमध्ये जाण्यासाठी बाईक हवी होती मात्र, बाईक देण्यास नकार दिल्याने त्याला राग आला. 

या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. कॉलेजमध्ये गेलेल्या या विद्यार्थ्याकडे पेट्रोल किंवा रॉकेल कसे आले? तसेच या तरुणाने स्वत:ला पेटवून घेण्यामागे आणखी काही कारण तर नाही ना? या सर्वांचा तपास पोलीस करत आहेत.

हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून तो जवळपास ९६ टक्के भाजला असल्याची माहिती मिळत आहे. या विद्यार्थ्याला अधिक उपचारासाठी ऐरोली परिसरात असलेल्या बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी