Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांना पोलिसांकडून अटक, ठाण्यात हर हर महादेवचा शो पाडला होता बंद

ठाणे
तुषार ओव्हाळ
Updated Nov 11, 2022 | 16:20 IST

Jitedra Awhad Arrested : कळवा मुंब्र्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विवियाना मॉल येथील हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. तेव्हा आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला मारहाणही केली होती. या प्रकरणी ठाणे वर्तक पोलिसांनी आव्हाडांना अटक केली आहे.

jitendra awhad
 फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कळवा मुंब्र्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.
  • काही दिवसांपूर्वी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विवियाना मॉल येथील हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला होता.
  • तेव्हा आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला मारहाणही केली होती.

Jitedra Awhad Arrested : ठाणे : कळवा मुंब्र्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विवियाना मॉल येथील हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. तेव्हा आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला मारहाणही केली होती. या प्रकरणी ठाणे वर्तक पोलिसांनी आव्हाडांना अटक केली आहे. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे,  आपल्याला फाशी दिली तरी चालेल परंतु आपण गुन्हा कबुल करणार नाही असे आव्हाड यांनी ट्विटरवर म्हटले आहे. 

अधिक वाचा : अजितदादा नाराज होते का, स्वतः त्यांनी केला खुलासा 

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी अटक केली आहे. आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल झाली होती. आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हर हर महादेव या चित्रपटाचा शो जबरदस्तीने बंद पाडला होता असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आल आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेवचा शो सुरू होता. तेव्हा आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा शो बंद पाडला. तसेच आव्हाडाच्या कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला मारहाणही केली होती. सध्या आव्हाडांसह काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. 

अधिक वाचा :   Kirit Somaiya : किरीट सोमय्या रत्नागिरी दौर्‍यावर, अनिल परबांच्या रिसॉर्टवर कारवाई करण्याची मागणी

सोमवारी विवियाना मॉलमध्ये हर हर महादेवची स्क्रीनींग सुरू होती. या चित्रपटात शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. या वेळी एका प्रेक्षकाने आव्हाड यांना विरोध केला, तेव्हा आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी या प्रेक्षकाला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर ठाण्यातील वर्तक नगर पोलीस स्थानकात आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना चौकशीसाठी बोलवले होते. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. 

अधिक वाचा :  Ambet Bridge : रायगड रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणार्‍या पुलावरून दुचाकीस्वारांचा धोकादायक प्रवास, शासनाचे दुर्लक्ष


आव्हाडांनी फेटाळले आरोप

तर दुसरीकडे आव्हाडांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. पोलिस यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. आव्हाड यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ”आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल असे आव्हाडांनी म्हटले आहे. तसेच हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही असेही आव्हाड यांनी नमूद केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी