भिवंडी तालुक्यातून ९ बांगलादेशींना अटक

ठाणे
रोहन जुवेकर
Updated Nov 20, 2021 | 12:10 IST

Nine Bangladeshi immigrants arrested in Maharashtra's Thane for illegal stay ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातून नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. अनधिकृतरित्या भारतात वास्तव्य केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांच्या क्राइम ब्रँचने ही कारवाई केली आहे.

Nine Bangladeshi immigrants arrested in Maharashtra's Thane for illegal stay
भिवंडी तालुक्यातून ९ बांगलादेशींना अटक 
थोडं पण कामाचं
  • भिवंडी तालुक्यातून ९ बांगलादेशींना अटक
  • अनधिकृतरित्या भारतात वास्तव्य केल्याप्रकरणी अटक
  • ठाणे पोलिसांच्या क्राइम ब्रँचने कारवाई केली

Nine Bangladeshi immigrants arrested in Maharashtra's Thane for illegal stay भिवंडी: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातून नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. अनधिकृतरित्या भारतात वास्तव्य केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांच्या क्राइम ब्रँचने ही कारवाई केली आहे. घुसखोर बांगलादेशी नागरिकांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन मायदेशी पाठवले जाईल. अटक केलेले नऊ जण भिवंडी तालुक्यातील सरवली गावात वास्तव्यास होते.

कल्याण-भिवंडी मार्गावरील अवनी टेक्स्टाइल कंपनी येथे बांगलादेशी नागरिक अनधिकृतरित्या वास्तव्यास असल्याची ठोस माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीआधारे धाड टाकून ठाणे पोलिसांच्या क्राइम ब्रँचने नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. अटक केलेल्यांपैकी सलिम अमिन शेख उर्फ असगर सोळा वर्षांपासून भिवंडीच्या नाडी नाका परिसरात वास्तव्यास होता. असगरनेच इतरांना भिवंडी तालुक्यात आणले होते.

पोलिसांनी ज्या नऊ जणांना अटक केली त्यांची नावं जाहीर केली आहे. ही नऊ जण अनुक्रमे सलिम अमिन शेख उर्फ असगर (३०), रसल अबु हसन शेख (२७), मोहम्मद शिन मोहम्मद अकबरलाई शेख (२४), मोहम्मद मासूम शिदुल्ला इस्लाम (२१), तरुण मणिराम (२१), सुमन मणिराम (२५), इस्माइल अबु ताहिर खान (१९), आझम युसुफ खान (१९), मोहम्मद आमिर अबु सुफिया खान (२६) अशी आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी