no power supply in Dombivli for six hours : डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे आज (शुक्रवार ६ मे २०२२) सकाळी सहा ते दुपारी बारा अशा सहा तासांसाठी विजेचा पुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत विजेचा पुरवठा करणाऱ्या तारांची आणि इतर उपकरणांची देखभाल दुरुस्ती केली जाईल. महावितरण कंपनीने ही माहिती दिली. ऐन उकाड्यात वीज पुरवठा सहा तास बंद राहणार असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
डोंबिवलीला विजेचा पुरवठा करणारे सहा फीडर बंद करून वीज पुरवठा बंद केल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली. डोंबिवली पूर्वेतील सावरकर रोड, तुकारामनगर, पी ॲन्ड टी कॉलनी, नांदिवली, पांडुरंगवाडी, आगरकर रस्ता,टिळकनगर,चार रस्ता आणि डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा, गरीबाचापाडा, जय हिंद कॉलनी, गुप्ते रस्ता, शास्त्रीनगर येथे विजेचा पुरवठा बंद आहे; असे महावितरण कंपनीने सांगितले.