No Water : कल्याणमध्ये मंगळवारी पाणी पुरवठा बंद, 'या' भागांत येणार नाही पाणी

ठाणे
सुनिल देसले
Updated Jun 27, 2022 | 14:31 IST

No Water in Kalyan: कल्याण पूर्व आणि पश्चिम भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. २८ जून रोजी १२ तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 

No water in Kalyan on 28 june 2022 as maintanance and repair work going on
कल्याणमध्ये मंगळवारी पाणी पुरवठा बंद, 'या' भागांत येणार नाही पाणी 
थोडं पण कामाचं
  • कल्याणमध्ये १२ तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार
  • मोहने उंदचन केंद्राला वीज पुरवठा होत असलेल्या फिडरच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार
  • नागरिकांनी पाण्याचा साठा करण्याचे महानगरपालिकेकडून करण्यात आलं आवाहन

कल्याण : जून महिना संपत आला असला तरी महाराष्ट्रात पाऊस हवा तसा बरसत नाहीये. पावसाच्या या लपंडावामुळे धरणांतील पाणी साठा आता आणखी कमी होऊ लागला आहे. त्यामुळे पाऊस जर पडला नाही तर नागरिंकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यातच आता कल्याणमध्ये १२ तासांसाठी पाणी पुरवठा बंद (No water in Kalyan for 12 hours on 28th June) ठेवण्यात येणार आहे. दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी हा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (Kalyan Dombivli Municipal Corporation) बारावे जलशुद्धीकरण केंद्राला मोहने उदंचन केंद्राद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मोहने उदंचन केंद्रास वीज पुरवठा होत असलेल्या फिडरच्या दुरुस्तीचे काम महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडकडून करण्यात येणार आहे. २८ जून २०२२ रोजी हे काम हाती घेण्यात येणार असल्याने मंगळवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत मनपाच्या बारावे जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या भागात होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

मंगळवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर बुधवारी सुद्धा कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याचा साठा करुन महानगरपालिकेला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पावसाअभावी मुंबईत पाणी कपात

जून महिना संपत आला असतानाही पाऊस पडत नाहीये. धरणक्षेत्रात पाऊस पडत नाहीये आणि त्याचा परिणाम म्हणजे धरणातील पाणी साठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. यामुळेच २७ जून पासून मुंबईत पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता मुंबईत १० टक्के पाणी कपात सुरू केली आहे.

पावसाअभावी मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांमध्ये पुरेसा पाणीपुरवठा नसल्याने २७ जून २०२२ पासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र व बीएमसी पाणी पुरवठा करत असलेल्या ठिकाणी पाणीपुरवठ्यामध्ये १० टक्के कपात लागू करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी कृपया पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहनही करण्यात आलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी