ठाण्याच्या 'या' भागांमध्ये २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद

ठाणे
रोहन जुवेकर
Updated Jun 01, 2022 | 09:58 IST

no water supply in some area of thane for next 24 hours : जलवाहिनीशी संबंधित देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील निवडक भागांमध्ये बुधवार १ जून २०२२ रोजी सकाळी ९ ते गुरुवार २ जून २०२२ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

no water supply in some area of thane for next 24 hours
ठाण्याच्या 'या' भागांमध्ये २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ठाण्याच्या 'या' भागांमध्ये २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद
  • जलवाहिनीशी संबंधित देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी पुरवठा बंद
  • ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील निवडक भागांमध्ये बुधवार १ जून २०२२ रोजी सकाळी ९ ते गुरुवार २ जून २०२२ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद

no water supply in some area of thane for next 24 hours : ठाणे : जलवाहिनीशी संबंधित देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील निवडक भागांमध्ये बुधवार १ जून २०२२ रोजी सकाळी ९ ते गुरुवार २ जून २०२२ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या रॉ वॉटर पाईपलाईनची कल्याण फाटा भिवंडी येथे 'एन एच चार'च्या कामांतंर्गत गळती काढणे, टेमघर येथे २२ केव्ही सबस्टेशनमध्ये अत्यावश्यक कामे तसेच टेमघर जलशुध्दीकेंद्रामध्ये रॉ वॉटर (PAC) पाईपलाईनला जलमापक लावणे, टेमघर जलशुध्दीकरण केंद्रामधील सँड फिल्टरची दुरूस्ती करणे, बापगावजवळ रॉ वॉटर पाईपलाईनची जोडणी करणे ही कामं केली जाणार आहेत.

देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, समतानगर, गांधीनगर, सिध्दांचल, आकृती, सिध्देश्वर, जॉन्स्न, इटर्निटी, ब्रह्मांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, कोलशेत, आझादनगर, ऋतुपार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, डिफेन्स, येऊर, विठ्ठल क्रीडा मंडळ, सुरकुरपाडा तसेच कळवा व मुंब्रा येथील काही भागात पाणीपुरवठा गुरुवार २ जून २०२२ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच पुढील एक-दोन दिवस या भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी