No Water supply to Kalyan Dombivali on Tuesday : कल्याण डोंबिवली महानगरपालिका बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशु्द्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा करते. उल्हास नदीकाठी असलेल्या या चार जलशु्द्धीकरण केंद्रांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम असल्यामुळे मंगळवार २४ मे २०२२ या दिवशी कल्याण डोंबिवली मनपाच्या हद्दीत सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच बुधवार २५ मे २०२२ या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
नेतिवली केंद्रातून डोंबिवली शहराला, टिटवाळा केंद्रातून टिटवाळा, मांडा भागाला पाणीपुरवठा केला जातो. उर्वरित केंद्रांमधून कल्याण पूर्व, पश्चिम भागाला पाणीपुरवठा केला जातो. दररोज या केंद्रांमधून ३४० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो.