Palghar Accident, ST Bus Fall Into 20 Feet Deep Vally : पालघर : पालघरमध्ये मद्यधुंद चालकामुळे एसटी महामंडळाची बस २० फूट दरीत कोसळली आणि १५ प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात पालघर जिल्ह्यातील वाघोबा खिंडीच्या परिसरात झाला. भुसावळ ते बोईसर ही बस दरीत कोसळली. जखमी प्रवाशांवर पालघर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.
एसटीचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत होता. प्रवाशांनी चालकाबाबत तक्रार केली पण कंडक्टरने दुर्लक्ष केले. चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली, अशी प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी तपास होणार आहे.
अपघात सकाळी सहाच्या सुमारास झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात नेले. अपघात प्रकरणी चौकशी होईल आणि कायद्यानुसार कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले.