CM Shinde: मंत्रालयात सत्यनारायण पूजा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अडचणींमध्ये वाढ

ठाणे
रोहित गोळे
Updated Jul 29, 2022 | 17:23 IST

THANE: एकनाथ शिंदे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कारण मंत्रालयात सत्यनारायण पूजा केल्याप्रकरणी ठाणे कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

petition was filed against cm eknath shinde satyanarayan puja in mantralaya
मंत्रालयात सत्यनारायण पूजा, CM शिंदेंच्या अडचणीत वाढ  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदेविरोधात ठाणे कोर्टात याचिका दाखल
  • मुख्यमंत्री दालनात सत्यनारायण पूजा करण पडलं महागात
  • अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम होते असल्याचे सांगत भादवी कलम ४०६ प्रमाणे तक्रार दाखल

Satyanarayan Puja: मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. ठाण्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाणे न्यायालयात (Thane Court) याचिका दाखल केली आहे. एकनाथ शिंदे यांनी ७ जुलै रोजी मंत्रालयातील (Mantralaya) मुख्यमंत्री दालनात केलेल्या सत्यनारायण पूजा (Satyanarayan Puja) करून कारभाराला सुरुवात केली होती. मात्र, हीच सत्यनारायण पूजा करणे एकनाथ शिंदे यांना महाग पडणार आहे. (petition was filed against cm eknath shinde satyanarayan puja in mantralaya)

मंत्रालयातील आपल्या दालनात सत्यनारायणाची पूजा केल्या प्रकरणी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम होते असल्याचे सांगत भादवी कलम ४०६ प्रमाणे ठाणे न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अधिक वाचा: 'मुख्यमंत्र्यांचा पायगुण वाईट असेच म्हणावे लागेल'

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर भाजप सोबत युती करत पुन्हा सत्ता स्थापन केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी राजभवनात मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार  पडला. या शपथ विधीनंतर आपण स्थापित केलेली सत्ता सुरळीत सुरु राहावी यासाठी ७ जुलै रोजी मंत्रालयाच्या दालनात सत्यनारायण पूजा करून कारभाराला सुरुवात करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. 

याच सत्यनारायण पूजेला विरोध दर्शवत ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते धनाजी सुरोसे यांनी ठाणे न्यायालयात भादवी कलम ४०६ प्रमाणे ठाणे न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. येत्या १ ऑगस्ट रोजी या याचिकेवर पहिली सुनावणी होणार आहे. या प्रकरणी ठाणे न्यायालयातून न्याय न मिळाल्यास मुंबई सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं देखील याचिकाकर्ते धनाजी सुरोसे यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा: पवारांच्या मांडीवर बसून उद्धव ठाकरे काम करतात: रामदास कदम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज (7 जुलै) मंत्रालयातील (Mantralay) आपल्या कार्यालयात येऊन मुख्यमंत्रिपदाचा औपचारिकरित्या कारभार स्वीकारला. यावेळी स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्र्यांच्या दालनात हजर होते आणि त्यांनी अगदी हाताला धरून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवलं.

अधिक वाचा: Uddhav Thackeray Interview : एकनाथ शिंदे यांची हाव संपतच नाही, आता ते शिवसेना गिळायला निघालेत - उद्धव ठाकरे

शेवटच्या क्षणी शिंदे झाले मुख्यमंत्री

ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून येणार असंच सारे जण म्हणत होते. मात्र, मोदी-शहा आणि नड्डांच्या मनात नेहमी प्रमाणेच धक्कातंत्राचा वापर करावं असं आलं आणि शेवटच्या क्षणी सूत्रं फिरली. ज्या फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जात होतं त्यांनीच जाहीर केलं की, मुख्यमंत्री मी नाही तर एकनाथ शिंदे असतील.

खरं म्हणजे या सगळ्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकाच खेळीत अनेक पक्षी मारले. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदी बसून त्यांचं राजकीय वजन प्रचंड वाढलं आणि ठाकरेंना शिवसेनेतच पर्याय उभा केला. आधीच बंडखोरीने शिवसेनेची शकलं झालेली असताना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊन ठाकरेंशी चर्चा करण्याची गरज नाही हे भाजपने स्पष्ट करुन टाकलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी