Petrol Disel Price : महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये पेट्रोल डिझेल स्वस्त, पालघरवासियांची गुजरातमध्ये धाव

ठाणे
तुषार ओव्हाळ
Updated Apr 04, 2022 | 20:26 IST

गेल्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहे. असे असले तरी महाराष्ट्राच्या तुलनेत शेजारील राज्य गुजरातमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी आहेत. त्यामुळे गुजरातपासून जवळच असलेल्या पालघरचे वाहन चालक गुजरातमध्ये जाऊन पेट्रोल डिझेल भरत आहेत. यामुळे खूप बचत होत असल्याचे वाहन चालकांनी म्हटले आहे. 

petrol pump
पेट्रोल डिझेल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्राच्या तुलनेत शेजारील राज्य गुजरातमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी
  • पालघरचे वाहन चालक गुजरातमध्ये जाऊन पेट्रोल डिझेल भरत आहेत
  • यामुळे खूप बचत होत असल्याचे वाहन चालकांनी म्हटले आहे. 

Petrol Disel : पालघर : गेल्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहे. असे असले तरी महाराष्ट्राच्या तुलनेत शेजारील राज्य गुजरातमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी आहेत. त्यामुळे गुजरातपासून जवळच असलेल्या पालघरचे वाहन चालक गुजरातमध्ये जाऊन पेट्रोल डिझेल भरत आहेत. यामुळे खूप बचत होत असल्याचे वाहन चालकांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्रात प्रती लिटर पेट्रोलची किंमत ११४.६२ रुपये तर प्रति लिटर डिझेलची  किंमत ९७.३८ रुपये इतके आहे. तसेच प्रति किलो सीएनजीची किंमत ६६ रुपये इतकी आहे. याउलट गुजरातमध्ये प्रति लिटर पेट्रोलची किंमत ९९.९४ तर प्रतिलिटर डिझेलची किंमत ९४.०९ रुपये इतकी आहे. गुजरातमध्ये सीएनजीची किंमत ७१.८४ रुपये इतकी आहे.  

पेट्रोल डिझेलची किंमत गुजरातमध्ये कमी असल्याने गुजरातच्या भिलड, मुंबई अहमदाबाद हायवेवरी उमरगाव पेट्रोल पंपावर महाराष्ट्राच्या गाड्या दाखल होत आहे. इतकेच नाही तर तलासरी येथील एका पेट्रोल पंपाने महाराष्ट्राच्या तुलनेत पेट्रोल डिझेल कमी आहे असा बोर्ड लावला आहे. इथूनच पेट्रोल डिझेल भरा असे आवाहनही या जाहिरातीत केले आहे. 

तलासरीच्या रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातमधील पेट्रोल पंप इथून १२ किमी दूर आहे. गुजरातमधून पेट्रोल डिझेल भरल्यास मोठी बचत होते असे इथल्या रहिवाशांनी सांगितले. गुजरातमधून पेट्रोल डिझेल भरल्यास प्रति लिटर १२ ते १५ रुपयांची बचत होते अशी माहिती रहिवाशींनी दिली आहे. फक्त रहिवासीच नव्हे तर या मार्गावरून ट्रक चालकांनीही महाराष्ट्रात येण्यापूर्वी पेट्रोल डिझेल भरून घेण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात येण्यापूर्वी ट्रक चालक आपल्या कॅनमध्ये पेट्रोल डिझेल भरून घेतात त्यामुळेही पैश्यांची बचत होते असेही ट्रक चालकांनी म्हटले आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी