Dombivli डोंबिवलीच्या फडके रोडवर संचारबंदी

ठाणे
रोहन जुवेकर
Updated Nov 02, 2021 | 00:48 IST

Police ban Diwali Pahat programme at Fadke road in Dombivli सणासुदीच्या दिवसांत डोंबिवलीच्या फडके रोडवर नागरिकांची गर्दी हमखास दिसते. पण कोरोना संकटाचे कारण देत पोलिसांनी सलग दुसऱ्या वर्षी ऐन दिवाळीत फडके रोडवर संचारबंदी लागू केली आहे.

Police ban Diwali Pahat programme at Fadke road in Dombivli
डोंबिवलीच्या फडके रोडवर संचारबंदी 
थोडं पण कामाचं
  • डोंबिवलीच्या फडके रोडवर संचारबंदी
  • फडके रोड डोंबिवलीची ओळख
  • सलग दुसऱ्या वर्षी संचारबंदीमुळे ऐन सणासुदीत फडके रोडवर गर्दी होणार नाही

Police ban Diwali Pahat programme at Fadke road in Dombivli । डोंबिवली: सणासुदीच्या दिवसांत डोंबिवलीच्या फडके रोडवर नागरिकांची गर्दी हमखास दिसते. पण कोरोना संकटाचे कारण देत पोलिसांनी सलग दुसऱ्या वर्षी ऐन दिवाळीत फडके रोडवर संचारबंदी लागू केली आहे. कलम १४४ लागू करण्यात आले आहे. संचारबंदीमुळे पाच किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना फडके रोडवर एकत्र वावरता येणार नाही तसेच तिथे भाषणाचे वा आंदोलनाचे आयोजन करता येणार नाही. 

डोंबिवलीच्या फडके रोडवर गणपती मंदिर आहे. या मंदिरात दर्शनासाठी गर्दी होते. तसेच गप्पा मारणे, भेटणे, एकमेकांना शुभेच्छा देणे या निमित्ताने फडके रोडवर गर्दी होते. सणासुदीच्या दिवसांत फडके रोड गजबजलेला असतो. डोंबिवलीची तरुण पिढी सणांच्या दिवसांत फडके रोडवर वावरताना मोठ्या संख्येने दिसते. 

पोळीभाजी केंद्र, डोंबिवली फास्ट लोकल आणि डोंबिवलीकरांची संस्कृती आणि फडके रोड या चार गोष्टी डोंबिवलीची ओळख आहेत. सोशल मीडियावर डोंबिवली या मुद्यावरुन व्हायरल होणाऱ्या संदेशांमध्ये अनेकदा फडके रोडशी संबंधित मजकूर असतात. पण सलग दुसऱ्या वर्षी संचारबंदीमुळे ऐन सणासुदीत फडके रोडवर गर्दी होणार नाही. 

कोरोना संकटाची सुरुवात २०१९च्या उत्तरार्धात झाली. पण २०२० आणि २०२१ या दोन्ही वर्षांत ऐन दिवाळीत कोरोना संकटाचे कारण देत पोलिसांनी फडके रोडवर संचारबंदी लागू केली. यामुळे सलग दुसऱ्या वर्षी डोंबिवलीच्या फडके रोडवर दिवाळी पहाट कार्यक्रम होणार नाही तसेच भेटीगाठी घेणे आणि शुभेच्छा देणे या निमित्ताने गर्दी होणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी