Load shedding : कळवा भागात दुरुस्तीच्या नावाने लोडशेडिंग? मंगळवारी ५ तास वीजपुरवठा बंद, टोरंट कंपनीची ग्राहकांना पूर्वसूचना

ठाणे
तुषार ओव्हाळ
Updated Apr 18, 2022 | 15:57 IST

राज्यात कोळश्याचा तुटवडा असला तरी कुठल्याही प्रकारे लोडशेडिंग केले जाणार नाही असे महावितरणने स्पष्ट केले आहे. परंतु ठाण्यातील कळवा भागात दुरुस्तीच्या नावाखाली मंगळवारी ५ तास वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे. कळवा भागात टोरंट कंपनी वीजपुरवठा करते. मंगळवारी सकाळी साडे दहा ते सांयकाळी साडे चार पर्यंत वीजपुरवठा खंडित असणार आहे.

load shedding
लोडशेडिंग  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यात कोळश्याचा तुटवडा असला तरी कुठल्याही प्रकारे लोडशेडिंग केले जाणार नाही असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
  • परंतु ठाण्यातील कळवा भागात दुरुस्तीच्या नावाखाली मंगळवारी ५ तास वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
  • मंगळवारी सकाळी साडे दहा ते सांयकाळी साडे चार पर्यंत वीजपुरवठा खंडित असणार आहे.

Maharashtra Load Shedding : ठाणे : राज्यात कोळश्याचा तुटवडा असला तरी कुठल्याही प्रकारे लोडशेडिंग केले जाणार नाही असे महावितरणने स्पष्ट केले आहे. परंतु ठाण्यातील कळवा भागात दुरुस्तीच्या नावाखाली मंगळवारी ५ तास वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे. कळवा भागात टोरंट कंपनी वीजपुरवठा करते. मंगळवारी सकाळी साडे दहा ते सांयकाळी साडे चार पर्यंत वीजपुरवठा खंडित असणार आहे. दुरुस्तीसाठी हा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची पूर्वसूचना टोरंट कंपनीने दिली आहे. तसेच याबद्दल दिलगिरी व्यक्त करून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही कंपनीने केले आहे. 

मार्च महिन्यात सामान्य नागरिकांना उन्हाच्या झळा असहय्य झाल्या आहेत. महावितरणने कोळश्याचे नियोजन केल्याने भारनियमन होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरी कळवा भागात दुरुस्तीच्या नावाखाली पाच तासांचे लोडशेडिंग करत असल्याचा आरोप सामान्य नागरिक करत आहेत. काही दिवसांपूर्वी कळवा भागात तांत्रिक बिघाडामुळे अनेक तास वीज गायब होती. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. 

केंद्राकडून मुबलक कोळसा पुरवठा

महाराष्ट्र सरकारला सध्या  मार्च महिन्याच्या तुलनेत अधिक कोळसा पुरवठा प्राप्त होत असल्याचे कोळसा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या वृत्ताला उत्तर देताना, मंत्रालयाने सांगितले की, सद्यस्थितीत राज्य त्यांची कोळशाची गरज भागवत आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना (टीपीपी) 70.77 दशलक्ष टन (एमटी ) कोळशाचा पुरवठा करण्यात आला.  

विजेच्या मागणीत होत असलेल्या वाढीनुसार  औष्णिक प्रकल्पांना  कोळशाचा पुरवठा वाढवला जात आहे, असे कोळसा मंत्रालयाने सांगितले. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मार्च 2022 मध्ये, महाराष्ट्रातील वीज प्रकल्पांना दररोज 2.14 लाख टन कोळशाचा पुरवठा होत होता.हा कोळसा  पुरवठा  या महिन्यात/एप्रिल, 11.04.2022 पर्यंत दररोज 2.76 लाख टन पर्यंत वाढला आहे.
महाजेनकोला 2021-22 मध्ये 37.131 मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा करण्यात आला आहे. महाजेनकोला मार्च - 22 मध्ये होणारा दैनंदिन कोळसा पुरवठा 0.96 लाख टन प्रतिदिन होता जो एप्रिलमध्ये (11.04.22 पर्यंत) 1.32 लाख टन प्रतिदिन झाला आहे.महाजेनकोकडे सुमारे 2390 कोटी रुपयांची थकबाकी असतानाही महाराष्ट्राची कोळशाची गरज भागवली जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी