कल्याण डोंबिवलीत पहाटेपासून विजेचा पुरवठा खंडीत

ठाणे
रोहन जुवेकर
Updated Apr 22, 2022 | 09:12 IST

Power outage in Kalyan Dombivali since early morning : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण डोंबिवलीत आज (शुक्रवार २२ एप्रिल २०२२) पहाटेपासून विजेचा पुरवठा खंडीत आहे.

Power outage in Kalyan Dombivali since early morning
कल्याण डोंबिवलीत पहाटेपासून विजेचा पुरवठा खंडीत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कल्याण डोंबिवलीत पहाटेपासून विजेचा पुरवठा खंडीत
  • उकाडा वाढला असताना विजेचा पुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिकांचे हाल
  • पाल येथील वीज केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विजेचा पुरवठा खंडीत

Power outage in Kalyan Dombivali since early morning : कल्याण : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण डोंबिवलीत आज (शुक्रवार २२ एप्रिल २०२२) पहाटेपासून विजेचा पुरवठा खंडीत आहे. उकाडा वाढला असताना विजेचा पुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पहाटेपासूनच वीज नसल्यामुळे त्रस्त नागरिकांनी सकाळीच महावितरणच्या कार्यालयाबाहेर गर्दी करून नाराजी जाहीर केली. 

पाल येथील वीज केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विजेचा पुरवठा खंडीत झाला आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यास किती वेळ लागेल हे सांगता येणे कठीण आहे; अशा स्वरुपाचे तोंडी उत्तर महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांना देत आहेत. 

कल्याण ग्रामीण भागात अनेकांना विजेच्या बिलासोबत सुरक्षा ठेव अर्थात सिक्युरिटी डीपॉझिटचे (डीपॉझिट) बिल पाठविण्यात आले आहे. एकीकडे तांत्रिक बिघाडाचे कारण देत छुपे भारनियमन करायचे आणि या नाही तर त्या पद्धतीने वसुली करायची असे प्रकार महावितरण करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. मनसे आमदार राजू पाटील यांनीही महावितरणच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी