कळव्यातील पझल पार्किंग झाले फेल, जितेंद्र आव्हाडांनी केला व्हिडिओ व्हायरल

Thane : ठाण्यातील केशव हाईट इमारतीतील रहिवासी रविवारी फसवणुकीचा आरोप करत बिल्डरविरोधात एक दिवसीय उपोषणाला बसले आहेत

Puzzle parking in Kalva failed, Jitendra Awha made the video viral
कळव्यातील पझल पार्किंग झाले फेल, जितेंद्र आव्हाडांनी केला व्हिडिओ व्हायरल  |  फोटो सौजन्य: BCCL

ठाणे : कळवा येथील पारसिकनगर परिसरातील केशव हाईट इमारतीतील १०० हून अधिक रहिवासी बिल्डरच्या कथित फसवणुकीविरोधात उपोषणाला बसले आहेत. बिल्डरने अनेक सुविधांचे आश्वासन देऊनही त्या दिल्या नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला होता. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोसायटीतील नागरिकांच्या समस्येचा एक व्हिडिओ ट्विट केला. व्हिडिओमध्ये, सोसायटीच्या स्टॅक-पार्किंगमधून एक कार पडताना दिसत आहे. (Puzzle parking in Kalva failed, Jitendra Awha made the video viral)

अधिक वाचा : शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांना Y+ सुरक्षा, अमृता फडणवीसांनाही एस्कॉर्टची सुविधा


“बिल्डर्सनी कोणत्या दर्जाचे  पजल पार्किंग दिले आहे? गुणवत्ता तपासणी आहे का? कोणतीही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असेल?" असा सवाल आव्हाड यांनी ट्विटद्वारे केले आहे.

सोसायटीतील रहिवाशांचे म्हणणे आहे की, “पजल पार्किंगची अवस्था अत्यंत वाईट आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी ते बांधण्यात आले. त्यात आग विझवण्याच्या सुविधांचा अभाव आहे.”

अधिक वाचा : Crop insurance 509 दिवसांपासून सुरु असलेल्या पिकविम्याच्या लढाईला अखेर यश, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेही होतायेत जमा

बांधकाम व्यावसायिक म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केलेल्या पोस्टमागील खरी कहाणी वेगळी आहे. हे पजल पार्किंग चालवणारे तंत्रज्ञ जेवण करण्यासाठी बाहेर गेले होते, त्याच दरम्यान एका वाॅचमनने गाडीतून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. पण, तो करू शकला नाही आणि त्यामुळा गाडी एका बाजूला झुकली. मी रहिवाशांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी भेटणार आहे आणि वचनबद्धतेनुसार त्यांच्या मागण्या पूर्ण करेन.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी