मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीनं नोटीस पाठवली. त्यानंतर राजकारण चांगलंच तापलं. मनसेचे कार्यकर्ते चांगलेच संतापलेत. तसंच एका कार्यकर्त्यानं आत्महत्या केली आहे. त्यानं स्वतःला जाळून घेतलं आहे.
राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानं मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस
राज ठाकरे यांना नोटीस आल्यानं मनसैनिक संतप्त
नाराज महाराष्ट्र सैनिकानं केली आत्महत्या
ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांन स्वतःला पेटवून घेतलं
ठाणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिलप्रकरणी ईडीनं नोटीस बजावली. त्यानंतर राजकारण चांगलंच तापलेलं दिसलं. मनसेचे कार्यकर्ते देखील चांगलेच संतापलेले दिसले. नोटीस बजावताच त्यांनी ठाणे बंदची हाक देखील दिली होती. त्यातच आता राज ठाकरे यांना नोटीस आल्याच्या तणावातून मनसेच्या कार्यकर्त्यांनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
प्रविण चौगुले असं या मनसेच्या कार्यकर्त्यांचं नाव आहे. प्रविणनं स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली आहे. कळव्यातल्या विटावा परिसरात राहणाऱ्या प्रविणनं राहत्या घरी काल रात्री आत्महत्येचं पाऊल उचललं.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौगुलेनं आतापर्यंत तीन ते चार वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. प्रविणला आई वडील कोणी नसून त्याला दारूचंही व्यसन होतं. दारूच्या नशेत हा त्यानं हा प्रकार केला असेल अशी शक्यता असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.