[VIDEO]: 'माझ्या भाषणावर टाळी वाजवण्याऐवजी 'त्याच्या' गालावर टाळी वाजवली असती तर...': राज ठाकरे

ठाणे
सुनिल देसले
Updated Oct 12, 2019 | 19:37 IST

Raj Thackeray Rally: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा भिवंडीत पार पडली. राज ठाकरेंची भिवंडीतील जाहीर सभा पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. 

Raj Thackeray rally in Bhiwandi Thane
राज ठाकरेंची भिवंडीत जाहीर सभा 

थोडं पण कामाचं

 • राज ठाकरेंची भिवंडीत जाहीर प्रचार सभा
 • मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची जाहीर सभा
 • ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत जाहीर सभा 

भिवंडी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आपल्या सभांचा धडाका लावला आहे. आज राज ठाकरेंची भिवंडीत जाहीर सभा पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत भाषण करत शिवसेना-भाजप सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.

राज ठाकरेंची जाहीर सभा

 

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

 1. तुमचा राग व्यक्त करण्यासाठी कोणीतरी पाहिजे म्हणून मी माझी माणसं देत आहे
 2. तुमचा राग, तुमची मनं जिवंत ठेवा
 3. आज शेतकरी, तरुण, कामगार सर्वच त्रस्त झाले आहेत
 4. पोलीस आपले नोकर नाहीयेत 
 5. पोलिसांची कधी तुम्ही चर्चा केलीय का? २४ तास ते मेहनत करत असतात 
 6. रडत, हतबलतेने बसणं ही महाराष्ट्राची परंपरा नाहीये
 7. मनसेचे हे उमेदवार तुम्ही निवडून द्या तेव्हा पहिला अंकुश माझा यांच्यावर असणार आणि त्यानंतर हे सरकारवर अंकुश ठेवणार
 8. आज प्रत्येक भागात जातोय अनेक लोक राग व्यक्त करत आहेत... पण व्यक्त कुठे करायचा? सांगायचं कोणाला? म्हणून मी निर्णय घेतला की एका खंबीर विरोधी पक्षासाठी मनसेला मतदान करा
 9. मनसेने आंदोलन केल्यानंतर महाराष्ट्रातील जवळपास ७८ टोलनाके बंद झाले
 10. माझ्या हातात कुठलीही सत्ता नसताना रस्त्यावर तांडव करुन दाखवलेत
 11. तुमचा राग मतपेटीतून व्यक्त होण्याची गरज आहे
 12. मला आत्ताच कळलं की राज्य सरकार ३० टक्के सरकारी कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे
 13. राजकारण्यांच्या टक्केवारीमुळे हे खड्डे निर्माण झाले आहेत
 14. मी त्यावेळी आमच्या महापौरांना सांगितलं होतं कंत्राटदारांना सांगून ठेव, बांधकाम केल्यावर रस्त्यात खड्डे दिसले तर त्या खड्ड्यात उभं ठेवून तुला मारणार
 15. रस्त्यावरचे खड्डे भिवंडीत आहेत, ठाण्यात, मुंबईत, कल्याणमध्ये आहेत पण नाशिकमध्ये नाहीयेत
 16. माझ्या भाषणाला टाळ्या वाजवण्याऐवजी टोरंट कंपनीच्या अधिकाऱ्याच्या गालावर टाळी वाजवली असती तर ते कधीच सरळ झाले असते
 17. सरकार म्हणतं बँकेवर लक्ष ठेवायचं आमचं काम नाही तर आरबीआयचं काम आहे.. आरबीआय म्हणतं आम्ही हमी देऊ शकत नाहीत मग परवानग्या कशा दिल्या या बँकांना
 18. सात ते साडे सात हजार बँकेच्या ठेवी होत्या त्यातील सहा हजार कोटी एकाच कंपनीला दिले आणि ती कंपनी बुडाली
 19. आपल्याला आमदार, खासदार, नेत्याला विचारावसं वाटत नाही का?
 20. बँका बुडतायत, उद्योगधंदे बंद होत आहेत
 21. पीएमसी बँकेचे ग्राहक माझ्याकडे आले होते... रडत होते पैसे कसे परत मिळणार म्हणून 
 22. मेक्सिकोमध्ये रस्ते चांगले केले नाहीत म्हणून लोकांनी मंत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेलं
 23. थंड बसलेल्या लोकांचं नेत्रृत्व करायला मला आवडत नाही
 24. तुम्हाला राग किंवा चीड येत नाही का?
 25. सर्वत्र रस्त्यात खड्डे झाले आहेत
 26. रस्त्यांवरील खड्यांवरुन राज ठाकरेंचा संताप
 27. राज्याला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे
 28. पावसाची तक्रार करता येत नाही पण सरकारची तक्रार करता येते आणि त्यासाठी विरोधी पक्षाची आवश्यकता आहे
 29. प्रत्येकवेळी भाषण करतो तेव्हा आग लावत सुटतो आणि तुम्ही विझवायला यायला पाहिजे असं काही नाहीये 
 30. व्यासपीठावर आल्यावर पहिली नजर गेली अग्निशमन दलाच्या बंबाकडे
 31. राज ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात
 32. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं व्यासपीठावर आगमन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी