Raj Thackeray : ठाणे : गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांची दादरच्या शिवाजी महाराज पार्कात सभा झाली होती. या सभेत यांनी मशीदींवरील भोंग्याचा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच मशीदींवरील भोंगे उतरले नाही तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला होता. त्यावरून एकच वाद झाला होता. काही कार्यकर्त्यांनी घाटकोपर आणि कांदिवलीत मशीदींसमोर हनुमान चालीसा लावली होती. तर काही कार्यकर्त्यांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करून पदावरून राजीनामे दिले होते. आता ठाण्यातील या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाण्यातून राज ठाकरे Liveठाण्यातून राज ठाकरे Live ठाण्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे लाईव्ह, राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
Posted by Times Now Marathi on Tuesday, April 12, 2022