Raj Thackeray : Hanuman Chalisa : ठाणे: राज्यातील मशींदीवरील भोंगे काढा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू या भूमिकेचा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला. तसेच तीन मे पर्यंत या मशिदीवरी भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावूच असा अल्टिमेटमही राज ठाकरे यांनी दिला आहे.
गुढीपाडव्याच्या सभेनंतर राज ठाकरे यांच्यावर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने टीका केली होती, तर भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत केले होते. आता राज ठाकरे यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. वर्षभरातील सणवार असेल तर लाऊडस्पीकर लावणे चुकीचे नाही असे राज ठाकरे म्हणाले परंतु वर्षभर भोग्यांवर अझान आणि बांग देणे चुकीचे असल्याचे राज ठाकरे म्हणाले. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही यावर टिपण्णी केली आहे मग राज्य सरकार यावर का भूमिका घेत नाही असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. असे असले तरी सध्या रमजान सुरू आहे, ३ मे रोजी ईद आहे त्यानंतरही जर भोंगे दिसलेच तर आम्ही हनुमाच चालीसा लावणार असेही राज ठाकरे म्हणाले. तसेच मुस्लिम समाजाने मशीदींवर स्वतःहून हे भोंगे काढावे असे आवाहनही त्यांनी मुस्लिम समाजाला केले आहे.
ठाण्यातून राज ठाकरे Liveठाण्यातून राज ठाकरे Live ठाण्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे लाईव्ह, राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
Posted by Times Now Marathi on Tuesday, April 12, 2022