Raj Thackeray । भरती सुरु आहे पण... , मनसेच्या वर्धापन दिनी भाजपला सूचक इशारा

Raj Thackeray on : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 व्या वर्धापन दिनानिमित्त ठाण्यात राज ठाकरेंनी सभेतून मनसैनिकांना मार्गदर्शन केले.

Raj Thackeray's warning to BJP
Raj Thackeray । भरती सुरु आहे पण... , राज ठाकरेंचा भाजपला इशारा  |  फोटो सौजन्य: BCCL

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच भाजपला सूचक इशारा देताना राज ठाकरे यांनी म्हटले, भाजपनंही हे लक्षात ठेवावं की, सध्या भरती चालू आहे", अशा शब्दांत राज यांनी भाजपला सूचक इशारा दिला. (Raj Thackeray's warning to BJP)

अधिक वाचा : Maharashtra Budget for Farmers: शेतकऱ्यांसाठी खुशखबर; वर्षाला 12 हजार रुपये अन् एक रुपयात मिळणार पीक विमा

मनसेच्या १७ व्या वर्धापन दिनाच्या राज ठाकरेंनी सभेतून महाराष्ट्र सैनिकांना शुभेच्छा दिल्या. कोणती सत्ता नसताना तुमच्यात जी ऊर्जा आहे, ती पक्ष पुढे नेत असते त्यामुळे मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो असे ठाकरेंनी म्हटले. तसेच संदीप देशपांडेवर हल्ला करणाऱ्यांना देखील राज यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. 

अधिक वाचा : Maharashtra State Budget 2023 LIVE : महाराष्ट्राच्या 2023 अर्थसंकल्पात काय आहे? वाचा शेतकरी, महिला, नोकरदारांसाठी काय आहे तरतूद

ठाकरे म्हणाले, संदीप देशपांडे आत्मचरित्राची चार पाने वाढली त्या दिवशी काही बोललो नाही. ज्यांनी हल्ला केला आहे त्यांना ते समजेल. माझ्या मुलांचं रक्त असं मी वाया जावू देणार नाही, अशा शब्दांत राज यांनी देशपांडे यांच्या हल्लेखोरांना इशारा दिला. जे पक्ष सोडून गेले ते एक एकटे गेले. राजू पाटील एकटा विधानसभेत पक्षाची बाजू पक्षाची मांडत आहे. 'एक ही है लेकीन काफी है' असं म्हणत राज ठाकरेंनी आमदार राजू पाटील यांचे कौतुक केले. 

मनसेने जेवढी राजकीय आंदोलने घेतली तेवढी कोणी घेतली नाहीत. नाशिक मध्ये जेवढं काम झालं तेवढं २५ वर्षात काम झालं नाही. ५ वर्षात कोणावरही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. पाण्याचा प्रश्न नाशिक मध्ये सोडवला. लोकांना नेमकं काय हवंय, असा सवाल केला.

अधिक वाचा : ​ Metro-5 : अर्ध्या तासात कसारा,पनवेलहून गाठता येणार मुंबई; उल्हासनगरचा प्नवासही होईल उल्हासदायक

ठाकरे म्हणाले, आपण सत्तेपासून दूर नाही आहोत, मी आशा दाखवत नाही मला माहिती आहे ते कठीण आहे. पण महापालिका निवडणुका कधी होणार कळतं नाही आहे. नापास झालं असं वाटत आहे. महापालिकेच्या निवडणुका होऊ देत आपण सत्तेत असणार, जनता सगळ्यांना विटलेली आहे. भरती-ओहोटी येतच असते त्यामुळे लढत राहणार. याशिवाय भाजपनंही हे लक्षात ठेवावं की, सध्या भरती चालू आहे", अशा शब्दांत राज यांनी भाजपवर निशाणा साधला.  मशिदीवरील भोंगे बाबत २२ तारखेला बोलेन, असे सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी