Kedar Dighe : मुख्यमंत्री शिंदे इशारा देताच केदार दिघेंवर बलात्कार अन् धमकीचा गुन्हा दाखल

ठाणे
भरत जाधव
Updated Aug 03, 2022 | 08:37 IST

आनंद दिघे (Anand Dighe) यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांच्यावरती बलात्काराचा (rape) आणि धमकीचा (threat) गुन्हा दाखल झाल्याने पुन्हा एकदा राजकारणात खळबळ माजलेली आहे. यात केदार दिघेंसोबत आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकारणात पुन्हा उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. 

Rape case registered against Anand Dighe's nephew Kedar Dighe
आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • केदार दिघे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी ठाण्याचे नवे जिल्हा प्रमुख ही मोठी जबाबदारी दिली होती.
  • पोलिसांनी मात्र या प्रकरणात आणखी काही माहिती देण्यास स्पष्ट नकार

ठाणे :  आनंद दिघे (Anand Dighe) यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांच्यावरती बलात्काराचा (rape) आणि धमकीचा (threat) गुन्हा दाखल झाल्याने पुन्हा एकदा राजकारणात खळबळ माजलेली आहे. यात केदार दिघेंसोबत आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकारणात पुन्हा उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. 

केदार दिघे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच ठाण्याचे नवे जिल्हा प्रमुख ही मोठी जबाबदारी दिली होती. विविध मुद्द्यांवर ते एकनाथ शिंदे  यांनाही घेरण्याचा प्रयत्न करत होते. एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत घरोबा केल्यानंतर केदार दिघे हे उद्धव ठाकरेंकडे उरलेला सर्वात सक्षम पर्याय म्हणून पुढे आलेले होते. मात्र या गुन्ह्याने पुन्हा एकादा खळबळ माजली आहे. यात फक्त गुन्हा दाखल झाला नाही तर कोणत्याही क्षणी केदार दिघे यांच्यावरती कारवाईची शक्यता आहे. पोलिसांनी मात्र या प्रकरणात आणखी काही माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा नवे आरोप प्रत्यारोप सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. याही प्रकरणाला राजकीय रंग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Read Also : शिंदे सरकार जाणार की राहणार?, आज होणार फैसला

मुख्यमंत्र्यांना इशारा

दरम्यान काही वेळापूर्वीच त्यांनी दुसऱ्या एका प्रकरणात मुख्यमंत्र्यांना थेट इशाराही दिला होता. त्यांनी ट्विट करत लिहिले होते की, हा इशारा नाही शिवसैनिकांच्या मनातील संताप आहे! ठाणे हा #शिवसेनेचा,#दिघेसाहेबांचा बालेकिल्ला…जर जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकांना सत्तेचा वापर करून स्वार्थासाठी चुकीची कारवाई कराल,दबाव टाकाल तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरावर शिवसैनिकांना सोबत घेऊन मोर्चा काढावा लागेल!, असे ट्विट त्यानी केलं होतं. 

Read Also : बॅडमिंटनच्या सांघिक सामन्यात पी.व्ही. सिंधूचा विजय पण...

हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणार

आमदार उदय सामंत यांच्यावर काल रात्री झालेल्या हल्ल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध नोंदवला आहे. गाडीवर दगड मारून पळून जाणं ही मर्दुमकी नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे काम पोलिसांचं आहे. पोलीस हल्लेखोरांवर कारवाई करतील. ज्यांनी भ्याड हल्ला करणं आणि दगड मारून पळून जाणं ही मर्दुमकी नाही. मी पोलिसांशी बोलणार आहे. सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे. कोणी भडकावू भाषण करून चिथावणी देण्याचं काम करत असेल तर पोलीस कायदेशीर कारवाई करतील, असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी