Rape Crime : हैवान भाऊ अन् बाप: सहा महिन्यापासून अल्पवयीन मुलीवर बाप अन् भावाकडून लैगिंक अत्याचार, दोघांना अटक

ठाणे
भरत जाधव
Updated Jan 31, 2022 | 09:22 IST

कलियूग काय दिवस दाखवणार याची साधी कल्पना देखील केली जाऊ शकतं नाही. या युगात कोणत्याच नात्याला सीमा राहिलेले नाही. बाप, भाऊच्या नात्याला काळिमा दिवसेंदिवस फासला जात आहे. भाऊ आणि बाप या नात्याला तसेच यांना मुलीसाठी हे दोघे मोठं आधार असतात. पण हे आधार जर मुलीचा लैंगिक अत्याचार करत असतील तर?

Rape by a father and brother
बाप अन् भावाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुलीवर अत्याचार होत असताना आईनं पाळलं मौन
  • शेजारी राहणाऱ्या लोकांनी पोलिसात दिली तक्रार
  • मित्रांना चहा दिला म्हणून मुलीला विवस्त्र करुन मारहाण

Father And Brother Rape on Girl :  ठाणे :  कलियूग काय दिवस दाखवणार याची साधी कल्पना देखील केली जाऊ शकतं नाही. या युगात कोणत्याच नात्याला सीमा राहिलेले नाही. बाप, भाऊच्या नात्याला काळिमा दिवसेंदिवस फासला जात आहे. भाऊ आणि बाप या नात्याला तसेच यांना मुलीसाठी हे दोघे मोठं आधार असतात. पण हे आधार जर मुलीचा लैंगिक अत्याचार करत असतील तर? कल्याण (Kalyan) पूर्व (East) भागातील एका परिसरात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. येथे राहणाऱ्या मुलीवर वडील आणि भावाकडून सहा महिन्यांपासून लैंगिक अत्याचर होत असल्याची माहिती समोर आली आहे. 

शेजारी राहणाऱ्या लोकांच्या मदतीने मुलीने बाप आणि भावाविरोधात कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार नोंदविल्यानंतर पीडितेचा भाऊ आणि वडिलांना अटक केली आहे. याप्रकरणाविषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पीडिता कल्याण पूर्व भागात राहते. एकेदिवशी मुलीचा जोरजोरात रडण्याचा आवाज शेजारी राहणाऱ्यांना आला. त्यानंतर त्यांनी पीडितेच्या घरी येऊन पाहिलं तर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

मारहाणीनंतर सत्य आलं बाहेर

पीडितेला रडण्याचं कारण विचारलं तिने सांगितलं की, माझं काही मित्र घरी आले होते. त्यांना चहा पिण्यासाठी दिला. त्याचा राग येत माझ्या वडिलांना मला विवस्त्र करुन मारहाण केली. मात्र या मुलीने जेव्हा आणखी काही सांगितले तेव्हा लोक हैराण झाले. या अल्पवयीन मुलीचा बाप आणि तिचा भाऊ या मुलीवर काही महिन्यापासून लैगिंक अत्याचार करीत होते. आधी भाऊने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही बाब तिने तिच्या वडिलांना सांगितली तसेच तिच्या आईलाही सांगितली.

मुलीच्या अत्याचारावर आईचे मौन

वडील आणि भावाच्या गैरकृत्याची माहिती पीडितेने आपल्या आईला दिली. परंतु आईने या प्रकरणाविषयी मौन पाळलं होतं. आई काही बोलत नसल्यानं मुलीला अत्याचार सहन करावा लागत होता. या संकटातून आपली सुटका होण्यासाठी पीडितेने शेजाऱ्यांना ही गोष्ट सांगितली, पण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार कोण देणार या भीतीने कोणीही पुढे येत नव्हतं. सगळ्यात आधी भावाने गैरकृत्यास सुरुवात केली. त्यानंतर वडिलांनीही तिच्यासोबत गैरकृत्य करू लागले.

शेजाऱ्यांनी दिली पोलिसात तक्रार

मुलीची आई काही कामानिमित्त  बाहेर गावी गेली आहे. हा प्रकार ऐकून शेजा:यांनी मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बशीर शेख यांनी त्वरीत एक पथक नेमून या प्रकरणाची चौकशी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून  पोलीस अधिकारी हरीदास बोचरे यांच्या पथकाने या नराधम बाप- बेट्याला अटक केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी