CIDCO lottery : सिडकोच्या पाच हजार घरांची प्रजासत्ताक दिनी लॉटरी

ठाणे
रोहन जुवेकर
Updated Jan 23, 2022 | 16:20 IST

Republic Day lottery for 5000 CIDCO homes : कोरोना संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेली सिडकोच्या पाच हजार घरांची लॉटरी बुधवार २६ जानेवारी २०२२ रोजी काढण्यात येण्याची शक्यता आहे.

Republic Day lottery for 5000 CIDCO homes
सिडकोच्या पाच हजार घरांची प्रजासत्ताक दिनी लॉटरी 
थोडं पण कामाचं
  • सिडकोच्या पाच हजार घरांची प्रजासत्ताक दिनी लॉटरी
  • सिडकोच्या पणन विभागाने लॉटरीसाठीची तयारी केली
  • संचालक मंडळाने शिक्कामोर्तब केल्यास २६ जानेवारी रोजी सिडकोच्या घरांची लॉटरी काढण्यात येईल

Republic Day lottery for 5000 CIDCO homes : नवी मुंबई : कोरोना संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेली सिडकोच्या पाच हजार घरांची लॉटरी बुधवार २६ जानेवारी २०२२ रोजी काढण्यात येण्याची शक्यता आहे. सिडकोच्या पणन विभागाने लॉटरीसाठीची तयारी केली आहे. संचालक मंडळाने शिक्कामोर्तब केल्यास २६ जानेवारी रोजी सिडकोच्या घरांची लॉटरी काढण्यात येईल. जर प्रजासत्ताक दिनी लॉटरी काढली नाही तर पुढील काही दिवसांमध्ये लॉटरी काढली जाईल. पण लॉटरी काढण्यासाठी प्रजासत्ताक दिनाची निवड होण्याची शक्यता जास्त आहे.

लॉटरीची मुदत जाहीर झाल्यानंतर एक महिना या लॉटरीतील घरांसाठी अर्ज भरण्याची मुदत असेल. सिडकोने पाचनोडमध्ये २४ हजार घरांचे बांधकाम सुरू केले आहे. या घरांची लॉटरी २ ऑक्टोबर २०१८ पासून सुरू करण्यात आली आहे. टप्याटप्याने सहा वेळा लॉटरी काढण्यात आली. सात हजार घरे अपात्र ठरली आहेत. प्रतीक्षा यादीवरील पात्र लाभार्थींनादेखील घरांचे वाटप केले जात आहे. सात हजार घरे अपात्र ठरली असताना तेवढ्याच घरांचा ताबा देण्यात आला आहे. शिल्लक घरांची विक्री सिडको नव्याने करणार आहे. 

नव्या लॉटरी प्रक्रियेतील अर्ज ऑनलाइन विकले जातील. मुख्यमंत्री किंवा नगरविकासमंत्री यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. 

सिडकोने २०१८च्या लॉटरीत नवी मुंबई, पनवेल तसेच उरणमध्ये तळोजा, कळंबोली, खारघर, द्रोणागिरी, घणसोली येथे गृहप्रकल्प उभारले आहेत. यातील तळोजामधील घरे जास्त शिल्लक आहेत. या घरांचा समावेश नव्या लॉटरीत असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी