तक्रारदार महिला राज्य महिला आयोगाकडे जाणार, Jitendra Awhad यांच्या अडचणी वाढणार?

ठाणे
सुनिल देसले
Updated Nov 14, 2022 | 14:18 IST

Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानतंर आता त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

rida rashid will approch state women commission regarding assaulting manhandling by ncp leader jitendra awhad read in marathi
तक्रारदार महिला राज्य महिला आयोगाकडे जाणार, Jitendra Awhad यांच्या अडचणी वाढणार? 
थोडं पण कामाचं
  • महिलेच्या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
  • जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार करणारी महिला भाजपची पदाधिकारी
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मला ढकललं - महिलेचा आरोप

Maharashtra News: राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या विरोधात भाजपच्या महिला कार्यकर्त्याने विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. आव्हाड यांनी या महिलेला पकडून बाजूला केले. या प्रकरणी संबंधित महिलेने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल झाल्यावर तक्रारदार महिलेने पत्रकार परिषद घेत नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर भाष्य केलं. इतकेच नाही तर तक्रारदार महिला आता राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेणार आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Rida Rashid will approch state women commission regarding assaulting manhandling by ncp leader jitendra awhad read in marathi)

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तक्रार दाखल?

तक्रारदार महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला का? यावर तक्रारदार महिलेने पत्रकार परिषदेत म्हटलं, मुख्यमंत्री तर गाडीतून लगेचच निघून गेले होते, माझी आणि साहेबांची भेट झाली नाही.

हे पण वाचा : हिवाळ्यात कोवळ्या उन्हात बसण्याचे असंख्य फायदे​

मी सुप्रियाताईंना विचारेल की ज्या पद्धतीने माझ्यासोबत झालं आहे, हिच परंपरा आहे का? असंच आपण महिलांना ढकलून बाजूला काढता का? असंच होतं का तुमच्या पक्षात? हेच शिकवलं जातं का? या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून काय प्रतिक्रिया येते आणि माझ्या बाजून कधी स्टँण्ड घेतात हे मला पहायचं आहे असंही तक्रारदार महिलेने म्हटलं आहे.

हे पण वाचा : योनी स्वच्छ ठेवण्यासाठी खास टिप्स

तक्रारदार महिलेने अद्यापही कोणतीही तक्रार राज्य महिला आयोगाकडे केलेली नाहीये आणि त्यामुळे कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये. यावर तक्रारदार महिलेने म्हटलं, मी महिला आयोगाकडे नक्कीच जाईल. महिला आयोग आहे तर त्यांनीही स्वत:हून कारवाई केली तर मला आवडेल. कारण, महिलांच्या मदतीसाठी धावून जाण्यासाठी आहेत ना ते... मग महिला आयोग स्वत:हून धावून आले तरी चांगले होईल. मी नक्कीच महिला आयोगाकडे जाईल आणि ते सुद्धा माझ्याकडे आले तर मला आवडेल.

ही धक्काबुक्की आहे का?

गर्दीच्या ठिकाणी धक्काबुक्की होतेच असं अनेकांनी म्हटलं यावर तक्रारदार महिलेने म्हटलं, धक्का लागतो पण पकडून धक्का दिला जातो. या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. पकडून बाजूला करणं हे वेगळं आहे. तुम्ही व्हिडिओत जे पाहिलं आहे त्यातून स्पष्ट दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी