ulhasnagar | इमारत उडायची होती म्हणून पठ्ठ्याने एकामागून एक सोडले राॅकेट, Video पाहून पाहून थरकाप उडेल ...

Viral Video : दिवाळीत एका माथेफिरूने उल्हासनगर (पूर्व) परिसरातील इमारतीवर एकामागून एक अनेक रॉकेट डागले, VIDEO व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल उल्हासनगर पोलीस ठाण्यात संबंधितावर गुन्हा दाखल झाला आहे.

Rockets fired one after another at building, video viral in Ulhasnagar
ulhasnagar | इमारत उडायची होती म्हणून पठ्ठ्याने एकामागून एक राॅकेट सोडलs, Video पाहून पाहून थरकाप उडेल ...  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एेन दिवाळीत माथेफिरूने उल्हासनगरमधील रहिवशांचे जगणे केले मुश्लिक
  • इमारतीवर दिवाळीचे रॉकेट सोडले
  • VIDEO व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल उल्हासनगर पोलीस ठाण्यात संबंधितावर गुन्हा

ठाणे : राज्यात कोविड-19 चे निर्बंध संपल्यानंतर यंदा दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यादरम्यान काही उपद्रवी लोकांनी आपल्या कारनाम्यांनी सर्वसामान्यांच्या जीविताला धोका निर्माण केला. असाच एक प्रकार ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथून समोर आला असून, एका माथेफिरुने रहिवासी इमारतीवर एकामागून एक 'रॉकेट' डागले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यानंतर उल्हासनगर पोलिसांनी त्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. (Rockets fired one after another at building, video viral in Ulhasnagar)

अधिक वाचा : गिर्यारोहकांची मोहीम फत्ते, दरीत अडकलेला बैल 25 दिवसांनी सुरक्षित बाहेर काढला

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. उल्हासनगर (पूर्व) येथील शहाड परिसरातील गोल मैदानाजवळ रविवारी रात्री ही घटना घडली. माथेफिरु दिवाळीत रॉकेट उडवत असताना हीरा पन्ना इमारतीला जाणूनबुजून लक्ष्य करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तो एकामागून एक दिवाळी रॉकेट अपार्टमेंटच्या बाहेरील एअर कंडिशनरच्या बाहेरील युनिटला धडकतात आणि काही बाल्कनीतून फ्लॅटमध्ये प्रवेश करतात.

अधिक वाचा : Fire: राज्यातील अनेक शहरात फटाक्यांनी लावली आग; पुण्यात 17 तर वसईत सहा ठिकाणी लागली आग
इमारतीतील रहिवाशाच्या तक्रारीच्या आधारे, उल्हासनगर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी दिवाळीत इमारतीला लक्ष्य करून रॉकेट का सोडले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी