VIDEO: आत्महत्येसाठी तो रेल्वे रुळावर झोपला, समोरुन भरधाव लोकल आली आणि...

ठाणे
सुनिल देसले
Updated Feb 26, 2021 | 16:52 IST

Local train: मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनच्या ट्रॅकवर झोपून एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी या व्यक्तीचे प्राण वाचवले. 

RPF personnel averted a suicide attempt when they dragged a man out of railway tracks at Virar
VIDEO: आत्महत्येसाठी तो रेल्वे रुळावर झोपला, समोरुन भरधाव लोकल आली आणि...  |  फोटो सौजन्य: ANI

विरार : मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनच्या रुळावर झोपून आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला. विरार रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला आहे. यावेळी रेल्वे स्थानकात ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानांनी या व्यक्तीला पाहिलं आणि तात्काळ धाव घेत त्याला रेल्वे रुळावरुन बाजूला केलं. 

ही घटना २४ फेब्रुवारी २०२१ रोजीची आहे. एक व्यक्ती विरार रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅकवर जाऊन झोपतो. आत्महत्या करण्यासाठी त्याने हे पाऊल उचललं. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीच्या आईचं निधन झालं होतं आणि त्यामुळे तो नैराश्यात होता. यानंतर त्याने आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.

विरार रेल्वे स्थानकात ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानांनी त्या व्यक्तीला रेल्वे रुळावर झोपलेलं पाहिलं आणि त्याचवेळी समोरून लोकल येत होती. यावेळी आरपीएफ जवानांनी तात्काळ त्याच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला रेल्वे रुळावरुन बाजूला केलं. यामुळे या व्यक्तीचे प्राण वाचले.

ही संपूर्ण घटना विरार रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ न्यूज एजन्सी एएनआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ज्या पद्धतीने आरपीएफ जवानांनी प्रसंगावधान दाखवत या व्यक्तीचे प्राण वाचवले त्याबद्दल सर्व नागरिक आरपीएफ जवानांच्या कार्याचं कौतुक करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी