मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राडा, शिंदे आणि ठाकरे गटात हाणामारी

ठाणे
रोहन जुवेकर
Updated Nov 15, 2022 | 10:15 IST

scuffle between shinde thackeray faction :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातील वागळे इस्टेटमधील किसननगर भागात राडा झाला. शिंदे आणि ठाकरे गटात हाणामारी झाली.

scuffle between shinde thackeray faction
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राडा, शिंदे आणि ठाकरे गटात हाणामारी 
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राडा
  • शिंदे आणि ठाकरे गटात हाणामारी
  • राड्याप्रकरणी पोलीस तपास सुरू

scuffle between shinde thackeray faction :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातील वागळे इस्टेटमधील किसननगर भागात राडा झाला. शिंदे आणि ठाकरे गटात हाणामारी झाली. या हाणामारीत ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते जखमी झाले. ठाण्यातील राड्याप्रकरणी रात्री उशीरा श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

Shraddha Murder case: क्राईम सीरिज पाहून गर्लफ्रेंडचे 35 तुकडे केले, असं काय आहे या अमेरिकन टीव्ही शोमध्ये? 

Murder of partner: 1400 किलोमीटर दूर नेऊन केली लिव्ह-इन पार्टनरची हत्या, नंतरची कृती अधिकच भयंकर

किसनगर येथील भटवाडी परिसरात ठाकरे गटाच्या संजय घाडीगावकर यांनी एक बैठक बोलावली होती. बैठकीला ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे उपस्थित होते. बैठक ज्या ठिकाणी सुरू होती त्याच भागाजवळ शिंदे गटाचे कार्यकर्ते एका कार्यक्रमासाठी जमले होते. एका क्षणी दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. घोषणाबाजीची तीव्रता वाढली. काही कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावले आणि हाणामारी झाली. हाणामारीत ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते जखमी झाले. राड्याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

राड्याचा इतिहास

महाविकास आघाडी 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. निवडक छोटे पक्ष आणि काही अपक्ष आमदार यांनीही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. महाविकास आघाडीने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार होते. पण एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्या युतीचे सरकार राज्यात कार्यरत झाले. सत्तांतर झाले तरी एकनाथ शिंदे गट आणि उद्धव गट यांच्यातील संघर्ष थांबलेला नाही. महाराष्ट्रात अधूनमधून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव गट यांच्यात संघर्ष होत आहे. प्रामुख्याने मुंबई आणि ठाण्यात दोन्ही गटांमधील संघर्षाची तीव्रता जास्त आहे. ठाण्यात झालेला राडा हा एकनाथ शिंदे गट आणि उद्धव गट यांच्यातील संघर्षाचे ताजे उदाहरण आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी