Sheezan Khan Forced Tunisha Sharma To Follow Islam I Will Not Sit Quietly Until Sheezan Is Punished Says Actress Mother Vanita Sharma : तुनिषा शर्मा प्रकरणातील 'लव्ह जिहाद'चा मुद्दा आणखी पेटण्याची शक्यता आहे. अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने लग्न करण्याआधी मुस्लिम धर्म स्वीकारावा यासाठी अभिनेता शीजान खान आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या दबाव टाकत होते, असा दावा तुनिषाच्या आईने केला आहे. तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी एक पत्रकार परिषद घेऊन हा धक्कादायक दावा केला आहे.
तुनिषा शर्मा आणि शीजान खान यांची मैत्री होती. अनेकदा वेगवेगळ्या निमित्ताने तुनिषा शीजानला महागड्या भेटवस्तू देत होती. सुरुवातीला सर्व व्यवस्थित होते. पण मागील काही काळापासून तुनिषावर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला जात होता. धर्मांतराबाबतचा निर्णय घेत नाही म्हणून शीजानने तुनिषासोबत आधीच्या तुलनेत संवाद साधणे कमी केले होते. यामुळेच तुनिषा दबावात होती. तिने एकदा शीजानशी बोल असेही आईला सांगितले होते. पण तुनिषा प्रचंड मानसिक दबावाखाली आहे आणि आत्महत्येसारखे पाऊल उचलेल याची जाणीव आईला नव्हती. ती शीजानशी बोलून परिस्थिती निवळावी यासाठी प्रयत्न करत होती. पण शीजानकडून असलेला दबाव असह्य झाला आणि तुनिषाने टोकाचे पाऊल उचलले, असे तिच्या आईने सांगितले.
शीजानची आई तुनिषाला त्रास देत होती तर शीजानची बहीण तुनिषाला दर्ग्यात घेऊन जात होती. धक्कादायक म्हणजे शीजानने तुनिषाला लग्न करण्याचे वचन दिले आणि तिच्यावर वारंवार मुस्लिम धर्म स्वीकारम्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. एकदा तर शीजानने तुनिषाला थोबाडीत मारले होते; असे तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी सांगितले.
तुनिषाने शीजानच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या एका मुलीचे चॅट बघितले आणि वाचले. हे चॅट वाचल्यावर शीजान आपली फसवणूक करत आहे आणि दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे तुनिषाच्या लक्षात आले. यानंतर तुनिषा आणि शीजान यांच्यात वाद झाला. शीजानने तुनिषाला थोबाडीत मारले होते.
तुला काय हवं ते कर, असे शीजान तुनिषाला म्हणाला. यामुळे तुनिषा अस्वस्थ झाली होती. कहर म्हणजे शीजानची आई अधूनमधून तुनिषाशी बोलताना शीजानच्या दुसऱ्या मैत्रीणीचे गोडवे वारंवार गात होती. यामुळे तुनिषाला आणखी त्रास होऊ लागला.
याआधी शीजान आणि तुनिषा यांच्यात सर्व काही व्यवस्थित होते त्यावेळी तुनिषा शीजानच्या आईला अम्मी आणि शीनाजनच्या बहिणीला अप्पी बोलू लागली होती. वनिता शर्मा यांना कुत्र्याची भीती वाटते. पण शीजानच्या घरच्यांनी सांगितले म्हणून तुनिषाने घरात कुत्र्याचे पिल्लू पाळले होते. शीजानसाठी तुनिषा हिजाब वापरू लागली होती. उर्दू शिकत होती. तुनिषा बदलत होती. अचानक तिला शीजान दुसऱ्या मैत्रीणीची माहिती मिळाली. यानंतर वाद झाला आणि शीजानने थोबाडीत मारले तसेच तुला काय हवं ते कर, असे सांगितले. या घडामोडींमुळे अस्वस्थ झालेल्या तुनिषाने टोकाचे पाऊल उचलले. यामुळे तुनिषाच्या प्रकरणात शीजानला अटक व्हायला हवी अशी मागणी वनिता शर्मा यांनी केली. जोपर्यंत शीजानला शिक्षा होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असे वनिता शर्मा यांनी सांगितले.
वसई कोर्टाने तुनिषा प्रकरणात शीजानला शनिवार 31 डिसेंबर 2022 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.