"कुठल्या तोंडाने सांगू, घात झाला साहेब...." म्हणत खासदार राजन विचारेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, VIDEO होतोय तुफान व्हायरल

ठाणे
सुनिल देसले
Updated Aug 19, 2022 | 14:39 IST

Shiv Sena MP Video goes viral: शिवसेनेत बंडखोरी झाली आणि राज्याच्या राजकरणात एक मोठा भूकंप आला. शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याच दरम्यान आता शिवसेनेचे खासदार यांनी शेअर केलेला एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. 

Shiv Sena MP Rajan Vichare takes dig on Eknath Shinde indirectly video goes viral in social media watch it
"कुठल्या तोंडाने सांगू, घात झाला साहेब...." म्हणत खासदार राजन विचारेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, VIDEO होतोय तुफान व्हायरल 
थोडं पण कामाचं
  • खासदार राजन विचारे यांनी शेअर केला केलेला व्हिडिओ होतोय व्हायरल
  • आनंद दिघे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देणारा व्हिडिओ
  • व्हिडिओ शेअर करत शिंदे गटाला डिवचलं

Shiv Sena MP Rajan Vichare shared video with memories of Aanand Dighe: शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंडखोरी केली त्यानंतर त्यांच्यासोबत सेनेच्या तब्बल ३९ आमदारांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला. शिंदे यांच्या या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आणि अखेर ठाकरे सरकार (Thackeray Government) कोसळलं. शिवसेनेतील आतापर्यंतची ही सर्वात मोठी बंडखोरी ठरली. एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत मिळून राज्यात सत्तास्थापन केली. त्यानंतर शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची रांगच लागल्याचं दिसून आलं. नगरसेवकांपासून ते खासदारांपर्यंत अनेकांनी शिंदेंना जाहीर पाठिंबा दिला. याच शिंदे गटाने शिवसेनेवरही आपला दावा केला आहे. शिंदे गटात (Shinde Group) सहभागी होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी त्यांच्याच ठाण्यातील खासदार राजन विचारे (Shiv Sena MP Rajan Vichare) यांनी मात्र त्यांच्या गटात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. 

खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटात न जाता ठाकरेंसोबतच राहण्याचं जाहीर केलं आणि त्याचं बक्षीसही त्यांना मिळालं. खासदार भावना गवळी यांच्याऐवजी राजन विचारे यांची लोकसभेतील शिवसेनेच्या चीफ व्हीपपदी नियुक्ती करण्यात आली. याच खासदार राजन विचारे यांनी आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे.

अधिक वाचा : Saibaba nagar building collapse: बोरिवलीतील गितांजली इमारत कोसळतानाचा LIVE VIDEO

शिवसेनेचे ठाण्यातील खासदार राजन विचारे यांनी आपल्या फेसबूक पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यासोबतच्या व्हिडिओ क्लिप्सचा वापर करुन तयार केलेला एक व्हिडिओ राजन विचारेंनी शेअर केला आहे.

 
Posted by Rajan Vichare on Sunday, July 31, 2022

हा व्हिडिओ शेअर करताना त्याला एक वॉईस ओवर देण्यात आला आहे. ज्यामध्ये "घात झाला दिघे साहेब..." असं म्हटलं आहे. "मी आज जितका अस्वस्थ झालोय ना साहेब तितका यापूर्वी कधी नव्हतो. कारण आज एक अशी घटना घडली आहे ना साहेब... त्या घटनेमुळे फक्त शिवसैनिकच नाही तर एक शिवसेना पाहिलेला मराठी माणूसही खूप अस्वस्थ झाला आहे. आता कुठल्या तोंडाने सांगू साहेब... घात झाला साहेब... घात झाला... तो सुद्धा आपल्याच लोकांकडून... म्हणून आज तुमची आठवण येतेय साहेब..." असंही व्हिडिओत म्हटलं आहे. खासदार राजन विचारे यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी