नवनीत राणा नंतर आता शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल, पाहा नेमकं काय घडलं?

Shivsainik vs Eknath Shinde group: शिवसैनिक आणि शिंदे गटात डोंबिवलीत जोरदार राडा झाला होता. याच दरम्यान जोरदार वाद आणि धक्काबुक्की सुद्धा झाली होती.

Shiv Sena vs Eknath Shinde group in dombivli case registerd against sena woman activist booked over using derogatory language
नवनीत राणा नंतर आता शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल, पाहा नेमकं काय घडलं? 
थोडं पण कामाचं
  • शिंदेंच्या फोटोला विरोध अन् शिवीगाळ पडली महागात, डोंबिवलीतील महिलेविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल
  • डोंबिवलीत एकनाथ शिंदे गट आणि शिवसैनिकांत दोन दिवसांपूर्वी झाला होता राडा
  • डोंबिवलीतील रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल

Shiv Sena woman leader booked: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत शिंदे गट आणि ठाकरे यांच्यात एक संघर्ष सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. याच संघर्षातून डोंबिवलीत दोन दिवसांपूर्वी जोरदार राडा झाला. डोंबिवलीतील शिवसेनेच्या शाखेतल शिवसैनिक आणि शिंदे गटाचे समर्थक यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की, एका महिला पदाधिकाऱ्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केली. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अपशब्द वापरणं या महिलेच्या आता अंगलट आल्याचं दिसत आहे. (Shiv Sena vs Eknath Shinde group in dombivli case registered against sena woman activist booked over using derogatory language)

डोंबिवलीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे फोटो हटवण्यात आले होते. हेच फोटो पुन्हा लावण्यासाठी शिंदे समर्थक शिवसेना शाखेत दाखल झाले होते. यावेळी शिवसैनिक आणि शिंदे समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला. शिवसेनेच्या शाखेत प्रचंड गोंधळ आणि धक्काबुक्की सुद्धा झाल्याचं दिसून आलं. त्याच दरम्यान शिवसेनेच्या महिला पदाधिकारी असलेल्या कविता गावंड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत अपशब्द वापरले.

अधिक वाचा : प्रभाग रचनांच्या संदर्भात राज्य सरकारचा निर्णय; शिंदेंचा नवा धक्का, मविआला बसला मोठा झटका

या प्रकरणी कविता गावंड यांच्या विरोधात डोंबिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कविता गावंड यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस अधिक तपस करत आहेत. कविता गावंड या डोंबिवली विधानसभेच्या महिला संघटक आहेत. 

अधिक वाचा : Uday Samant: उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला, पुण्यातील कात्रज चौकात दगडफेक

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर काहींनी त्यांना पाठिंबा दिला आहे तर काही शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून डोंबिवलीतील शिवसेनेच्या शाखेतून आक्रमक शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटोज काढून टाकले. शिंदे पिता-पुत्राचे फोटोज काढल्यानंतर शिंदे समर्थक २ ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या शाखेत शिरले. त्यानंतर त्यांनी डोंबिवलीतील शाखेत एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे फोटोज लावले.

शाखेत पुन्हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे फोटोज लावण्यात आल्याचं शिवसैनिकांना कळताच ते आक्रमक झाले. यानंतर शिवसेनेच्या शाखेतच शिवसैनिक आणि शिंदे समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला. यावेळी शिवीगाळ आणि धक्काबुक्की सुद्धा झाल्याची घटना घडली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी