मुंबई : शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारविरोधात बंड करून बंडखोर आमदारांचा गट तयार केला आणि आज राज्याच्या सत्तेत भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचले आहेत. ज्या पक्षात आदेश चालतो अशा शिवसेनेत बंडखोरी होईल आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होतील हे आपण विचारही केला नव्हता.
शिवसेनेला बंडखोरी नवीन नाही, यातील काहींनी जणांनी स्वत:चा पक्ष काढला तर काहींनी दुसऱ्या पक्षात सामील झाले. शिंदे यांनी संपूर्ण शिवसेनेला हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर काही वेळात विराजमान होणार आहेत. शिंदे यांचे जीवन आणि त्यांचा राजकारणाचा प्रवास थक्क करणारा आहे.
2019 मध्ये निवडणुका झाल्या तेव्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे अशी चर्चा होती. अडीच अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद असे ठरले होते. तेव्हा त्यांचे नाव अग्रस्थानी होते पण भाजपने नकार दिला आणि युती तुटली. बाळासाहेब ठाकरे मातोश्रीवरूनच सत्ता आणि संघटन पाहत होते आणि सरकारवर रिमोट आपल्या हातात ठेवत होते, उद्धवही तोच मार्ग अवलंबतील. 2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. पण उद्धव ठाकरे यांच्या रुपाने पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील एका व्यक्तीने मातोश्रीबाहेर येऊन मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री झाले होते.
अधिक वाचा : बहिणीने हात धरले अन् तिच्या प्रियकराने मित्रांसह केला गँगरेप
एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 साताऱ्यात झाला. लहानपणीच त्यांनी गाव सोडलं आणि ठाण्यात स्थायिक झाले. शिंदे आज 58 वर्षांचे असून त्यांनी आपल्या शालेय जीवनाची सुरुवात ठाण्यातून केली. येथे ते सुरुवातीला ऑटो रिक्षा चालवत असे. त्यादरम्यान त्यांनी शिवसेना नेते आनंद दिघे यांची भेट घेतली, ही भेट त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. शिंदे यांची राजकीय करिअरची सुरूवात 18 व्या वर्षी सुरू झाली.
1997 मध्ये ते ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. त्यानंतर 2001 मध्ये ते ठाणे महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेते झाले. नगरसेवक असताना एका अपघातात त्यांनी त्यांचा 11 वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची मुलगी गमावली. त्यांचा दुसरा मुलगा श्रीकांत त्यावेळी 13 वर्षांचा होता. श्रीकांत हे आज शिवसेनेचा खासदार आहेत.
अधिक वाचा : पत्नीवर प्रचंड प्रेम करतात या नावाची मुले, तिला बनवतात राणी
एकनाथ शिंदे यांची राजकीय पकड आणि दूरदृष्टीने हळूहळू शिवसेनेत पकड निर्माण होऊ लागली. 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा शिंदे यांनी पक्षातील आपली प्रतिष्ठा वाढवण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांना खूप चांगल्या संधीही मिळाल्या आणि ते पूर्ण निष्ठेने पुढे जाऊ लागले. त्यानंतर पुत्र उद्धव ठाकरे आणि पुतणे राज ठाकरे यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईत बाळासाहेबांसाठी अडचणी निर्माण झाल्या, तेव्हा एकनाथ शिंदे यांची ठाकरे कुटुंबाशी जवळीक वाढू लागली.
2004 ची विधानसभा निवडणूक ठाण्यातून लढण्यासाठी त्यांना शिवसेनेकडून तिकीट मिळाले. हे तिकीट केवळ निवडणुकीचे नव्हते, तर हे तिकीट त्यांचा राजकीय प्रवास यशस्वी करण्यासाठी होते. 2004 मध्ये त्यांनी ठाण्यातून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 2009 मध्येही निवडणूक जिंकली. त्यांनी 2014 आणि 2019 मध्येही विजयाची अशीच कहाणी सुरु ठेवली. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्रीही राहिले आहेत. राजकारणी जेव्हा उंचावतात तेव्हा गुन्हेगारी प्रकरणेही पाठ सोडत नाहीत. एकनाथ शिंदे यांच्यावर 18 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे 11 कोटी 56 लाखांहून अधिक संपत्ती आहे. यामध्ये 2.10 कोटींची जंगम मालमत्ता आणि 9.45 कोटींची स्थावर मालमत्ता जाहीर करण्यात आली.
अधिक वाचा : Optical Illusion: कोरड्या खडकात 3 घुबड लपलेले
शिंदे यांच्यातील नेतृत्वगुण हा त्यांचा यूएसपी आहे. किंबहुना त्यांनी रस्त्यावरून सत्तेपर्यंतचा संघर्ष पाहिला आहे. नेतृत्वाच्या या गुणांमुळे शिंदे यांनी ठाकरे सरकारमधून बाहेर पडले आपल्या उद्दिष्टात नक्कीच यश येईल, असा विश्वास बंडखोर आमदारांना वाटत होता. यामुळेच एक एक करून अनेक आमदार सुरतमार्गे गुवाहाटीला पोहोचले होते. आता ते भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. अशा स्थितीत शिंदे यांचा दर्जा किती वाढतो, राज्याच्या राजकारणात त्यांची भूमीका किती ताकतवान आहे, हे येणारा काळच सांगेल, पण आज शिंदे हे राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचे व्यक्ती झाले आहेत.