धक्कादायक ! 32 वर्षीय विवाहित महिलेकडून 15 वर्षाच्या मुलाचं लैंगिक शोषण; बनवले स्व:ताचे अन् मुलाचे नग्न व्हिडिओ

ठाणे
भरत जाधव
Updated Jan 31, 2023 | 12:05 IST

आरोपी महिलेने वारंवार मुलाचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार पीडित मुलाच्या आईने दिली आहे. अल्पवयीन मुलाच्या आईने कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी (Kolsevadi) पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी महिलेला अटक केली आहे. आरोपी महिला नाशिकमधील (Nashik) असून तिचे नाव किर्ती आहे.

 Shocking! Sexual abuse of 15-year-old boy by a 32-year-old married woman
विवाहित महिलेचा अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, बनवला video  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पोलिसांनी महिलेवर बाल लैंगिक शोषण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
  • महिलेने मुलाला दारू आणि अश्लील चित्रपट पाहण्याचे व्यसन लावले.
  • हॉटेलमध्ये नेऊन बनवला नग्न व्हिडिओ.

ठाणे : कल्याणमध्ये (kalyan) एका 32 वर्षीय महिलेने ((woman)नववीत शिकणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार (Sexual assault)केल्याची घटना घडली आहे. आरोपी महिलेने वारंवार मुलाचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार पीडित मुलाच्या आईने दिली आहे. अल्पवयीन मुलाच्या आईने कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी 
(Kolsevadi) पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी महिलेला अटक केली आहे. आरोपी महिला नाशिकमधील (Nashik) असून तिचे नाव किर्ती आहे. (Shocking! Sexual abuse of 15-year-old boy by a 32-year-old married woman)

अधिक वाचा  : शिक्षक भरतीसाठी TAITपरीक्षा जाहीर; ऑनलाईन पद्धतीने भरा अर्ज

कोळसेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9वीत शिकणारा अल्पवयीन मुलगा हा कल्याणमध्ये राहतो. आरोपी महिला ही पीडित मुलाच्या कुटुंबीयांच्या ओळखीची. पीडित मुलाचे नाशिक येथे आपल्या आत्याकडे जाणे येणे असल्याने त्याची किर्तीशी ओळख झाली होती. 2019 मध्ये या महिलेशी पहिल्यांदा ओळख झाली. 

अधिक वाचा  : पोलिसांचा तणाव दूर करतात रफी अन् लता दिदी; वाढली कार्यक्षमता

अल्पवयीन मुलाच्या अज्ञानाचा फायदा घेत या महिलेने त्याला दारू आणि अश्लील चित्रपट पाहण्याचे व्यसन लावले. त्यानंतर तिने पीडित मुलाला आमिष दाखवून नाशिकला बोलावलं आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याला पुन्हा आपल्या घरी पाठवून दिलं. पीडित मुलाला हॉटेलमध्ये नेऊन त्याच्या सोबत दारू प्यायली. या दरम्यान महिलेने जबरदस्तीने त्याच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिने चक्क आपले आणि मुलाचे नग्न व्हिडीओ बनवले.

कसा आला समोर हा प्रकार

ही घटना घडल्यानंतर पीडित मुलाचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. ही बाब घरच्यांना लक्षात आली. अभ्यास न करता पीडित मुलगा कुणासोबत तरी फोनवर नेहमी  बोलत असतो, हे त्याच्या आईला जाणवले. एकेदिवशी आईने त्याचा मोबाईल तपासला त्यानंतर हा भयानक प्रकार समजला. हे काय प्रकरण आहे याबाबत आईने मुलाकडे विचारणा केली असता त्याने घडलेला संपूर्ण प्रकार सांगतिला.  

मुलाच्या कबुलीनंतर आईने त्याला घेऊन तातडीने पोलीस ठाणे गाठले आणि महिलेविरोधात तक्रार दिली. अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी महिलेवर बाल लैंगिक शोषण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास सुरू केला असल्याचे वृत्त मटा या वृत्तसंस्थेने दिले आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी