KALYAN | काय वेळ आली आहे, सीसीटीव्हीत चप्पल चोर कैद, शहाड परिसरात चप्पल चोरट्याचा धुमाकूळ

 चोरट्याची नजर कधी कशावर पडेल याचा नेम नाही. शहाड परिसरात असाच एक चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ऑफिस बाहेर काढलेली 7 ते 8 जणांच्या  चप्पला या चोरट्याने एकाच वेळी गोळा करून नेल्या आहेत. 

Slipper thief imprisoned on CCTV, slipper thief in Shahad
सीसीटीव्हीत चप्पल चोर कैद, शहाडमध्ये चप्पल चोरट्याचा धुमाकूळ  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • चोरट्याची नजर कधी कशावर पडेल याचा नेम नाही.
  • शहाड परिसरात असाच एक चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
  • ऑफिस बाहेर काढलेली 7 ते 8 जणांच्या  चप्पला या चोरट्याने एकाच वेळी गोळा करून नेल्या आहेत. 

शहाड :  चोरट्याची नजर कधी कशावर पडेल याचा नेम नाही. शहाड परिसरात असाच एक चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ऑफिस बाहेर काढलेली 7 ते 8 जणांच्या  चप्पला या चोरट्याने एकाच वेळी गोळा करून नेल्या आहेत. 

अधिक वाचा : ​पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्याला मिळणार आणखी एक लाभ

या चपलेतील एक चप्पल हातातून पडल्याचे देखील त्याच्या लक्षात आले नसल्याने हा चोरटा नशेखोर किंवा गर्दुल्ला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहाड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या नवरंग इमारतीत एका दुकानाच्या  आत बसलेल्या लोकांनी चपला दुकानाच्या बाहेर काढून ठेवले होते दुकानाचा दरवाजा बंद असल्याने बाहेर काय होतंय याची आज बसलेल्यांना कल्पना नव्हती याचाच फायदा घेत रस्त्यावरून आलेल्या एका चोरट्याने हे सगळे चप्पल जोड गोळा करून नेले. 

अधिक वाचा : ​ तुम्ही चुकीच्या व्यक्तीसोबत डेट तर करत नाहीत ना?

चोरट्याचे हे कृत्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. चप्पल घेऊन हा चोरटा वेगात स्टेशनच्या दिशेने निघून गेला. जाताना त्याच्या हातातील काही चप्पल खाली पडली मात्र ते त्याच्या लक्षात देखील आले नाही यामुळेच सीसीटीव्हीत दिसणारा हा चोरटा नशेखोर किंवा चरसी गर्दुल्ला असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे. 

मात्र गेल्या काही दिवसापासून शहर परिसरात चप्पल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून  चप्पला का चोरल्या जात आहे  व   चप्पल चोरी कशी थांबेल असे प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी