KALYAN: प्रवाशांच्या हाताला काठी मारुन करायचा मोबाईलची चोरी; आता रेल्वे पोलिसांनी त्याच्या हातात ठोकल्या बेड्या

ठाणे
भरत जाधव
Updated Apr 28, 2022 | 14:42 IST

लोकल (Local) व एक्स्प्रेस गाड्याच्या (Express) दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या हातावर काठीचा फटका मारत मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला (thief) कल्याण (Kalyan) रेल्वे पोलिसांनी (Railway police) बेड्या ठोकल्या आहेत.

railway police railway handcuffed to the mobile thief
काठी मारुन मोबाईल चोरणाऱ्या चोराला अटक   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या
  • गोरख सन्या शिगवे असे या चोरट्याचे नाव
  • चोरट्याच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 5 ते 6 गुन्हे दाखल

ठाणे : लोकल (Local) व एक्स्प्रेस गाड्याच्या (Express) दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या हातावर काठीचा फटका मारत मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला (thief) कल्याण (Kalyan) रेल्वे पोलिसांनी (Railway police) बेड्या ठोकल्या आहेत. कर्जत (Karjat) ते इगतपुरी (Igatpuri) दरम्यान गोदावरी एक्स्प्रेसमध्ये (Godavari Express) ही घटना घडली असून आरोपीने पाठलाग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला काठीचा धाक दाखवून पळून जाण्याच्या केला होता. परंतु पोलिसांना या चोरट्या अटक केली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, गोरख सन्या शिगवे असे या चोरट्याचे नाव असून या चोरट्याच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 5 ते 6 गुन्हे दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे. या चोरट्याची मोबाईल चोरण्याची पद्धत ऐकून पोलिसांनी प्रवशांना प्रवास करताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. धावत्या एक्स्प्रेस व लोकलमध्ये दरवाजात उभे राहू नका, मोबाईल पाहू नका, सतर्क रहा असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे. 

असा सापडला मोबईल चोरटा 

26 तारखेला सायंकाळी 7 च्या सुमारास गोदावरी एक्स्प्रेसच्या फुटबोर्डवर बसून १९ वर्षीय सोमनाथ धोत्रे हा विद्यार्थी कर्जत ते इगतपुरी प्रवास करत करत होता. गाडी कर्जत स्टेशनमधून मार्गस्थ होताच सोमनाथ दरवाज्यात उभा राहून फोनवर बोलत असताना ट्रॅकच्या शेजारी हातात काठी घेऊन उभ्या असलेल्या गोरख याने त्याच्या हातावर फटका मारला हा फटका मोबाईलवर बसल्याने या विद्यार्थ्याच्या हातातून मोबाईल खाली पडताच गोरख याने हा मोबाईल उचलून पळ काढला ही घटना प्रवाश्यानी पाहत आरडाओरडा सुरू केला त्या वेळी त्या परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी तात्काळ या चोराचा पाठला केला असता चोरट्याने पोलिसाला काठीचा धाक दाखवून पळून जाण्याच्या प्रयत्नात केला.

मात्र पोलिसांनी जीवाची पर्वा न करता त्याला पकडले. व त्याची जडती घेतली असता त्याच्याकडून चोरलेला मोबाईल मिळाल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या पोलिसांच्या माहितीनुसार हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून विविध पोलिस स्थानकात याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी