ठाणे : मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तरी आज उल्हासनगरमधील विद्यार्थी शाळेत जाण्याच्या बहाण्याने मित्रासोबत नदीत पोहण्यास गेला तेव्हा एका धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील उल्हास नदीत एका निष्पापाचा बुडून मृत्यू झाला आहे. मयत हा सकाळी 11 वाजता मित्रांसह उल्हास नदीत पोहायला गेला असताना ही दुर्दैवी घटना घडली. (Student went to Ulhas river with friends on the pretext of going to school, drowned, family in shock)
अधिक वाचा : Nitesh Rane : नितेश राणे झाले आक्रमक, मुंबई पालिका आयुक्तांकडे ही मोठी मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यदेव संतराज यादव असे मृत्यू झालेल्या शालेय विद्यार्थ्याचे नाव आहे. सूर्यदेव हा उल्हासनगर येथील सेंच्युरी हायस्कूलचा विद्यार्थी असून नेहमीप्रमाणे आज सकाळी तो शाळेत जाण्याच्या बहाण्याने घरून निघाला. मात्र शाळेत जाण्याऐवजी तो मित्रांसोबत उल्हास नदीत आंघोळीसाठी गेला होता.
अधिक वाचा : Anil Deshmukh: अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले, जे जे रुग्णालयात दाखल
त्याने मित्रांसोबत नदीत आंघोळही केली होती, दरम्यान खोल पाण्यात गेल्याने तो बुडू लागला, असे सांगितले जात आहे. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी इतर लोकांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बेपत्ता विद्यार्थ्याचा शोध सुरू केला. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने सूर्यदेवचा मृतदेह बाहेर काढला. पोलिस संतराजसोबत गेलेल्या मित्रांची आणि नदीच्या आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांची चौकशी करत आहेत. पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.