Suspicious boat found in Raigad Maharashtra: रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे दोन संशयास्पद बोट आढळून आल्या आहेत. इतकेच नाही तर या बोटवर तीन एके ४७ रायफल्स, काही जिवंत काडतूसे आणि इतर साहित्य आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या बोट संदर्भात आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. (Suspicious boat in Raigad harihareshwar beach maharashtra with ak 47 rifles read updates in marathi)
ही संशयास्पद बोट यूकेमधील एका कंपनीच्या नावावर रजिस्टर्ड आहे. रायगड पोलिसांना दोन व्यक्तींची माहिती मिळाली आहे. त्या संदर्भात काही कागदपत्रे मिळाले असून ते दोन्ही नागरिक इंडोनेशियाचे नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच एका ऑस्ट्रेलियन व्यक्ती संदर्भातही काही माहिती पोलिसांना मिळाली आहे. बोटवर हे सर्व कागदपत्रे आढळून आले आहेत. आता हे नागरिक कुठे आहेत याची माहिती पोलीस घेत आहेत.
#Breaking — TIMES NOW (@TimesNow) August 18, 2022
Massive terror threat looming in #Maharashtra? #HighAlert sounded over #Raigad district and rest of the state as cache of AK-47 rifles recovered from a boat, #ATS team leaves for site of discovery.@DEKAMEGHNA with more details on the illegal arms cache capture. pic.twitter.com/tE1v01FNwB
ही बोट ओमान येथे रेस्क्यू करण्यात आली होती. तेथील प्रशासनाने ही बोट रेस्क्यू केल्यावर तेथेच अँकर करुन अडकवण्यात आली होती. मात्र, समुद्र खवळलेला असल्याने अँकर केलेली ही बोट तेथून निघाली आणि भरकटत रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर आली असल्याचं बोललं जात आहे. सकाळी ८ वाजता स्थानिक नागरिकांना ही बोट दिसून आली आणि बोटीवर शस्त्रसाठा आढळून आला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि त्यानंतर ताबडतोब ही बोट, त्यावरील साहित्य जप्त केलं.
अधिक वाचा : रायगडमध्ये दोन संशयास्पद बोट आढळल्या; बोटीत शस्त्रसाठा असल्याने खळबळ, संपूर्ण जिल्ह्यात हाय अलर्ट
#Breaking | Weapon-loaded boat has been found at Harihareshwar beach; a probe has been initiated. — TIMES NOW (@TimesNow) August 18, 2022
We will probe the terror links as well: Sudhir Mungantiwar, Maharashtra Minister@DEKAMEGHNA with details.#Maharashtra #Raigad pic.twitter.com/lNiBV5lLa1
ही बोट यूकेची असल्याची माहिती समोर येत आहे. नेप्यच्यून मेरिटाइम सिक्युरिटीचे स्टीकर बोटीवर सापडले आहेत. एके ४७ रायफल असलेल्या बॉक्सवर देखील हे स्टीकर आहेत. त्यामुळे शस्त्रे असलेला हा बॉक्स मेरिटाइम सिक्युरिटी पुरवणाऱ्या कंपनीचा असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रायगडच्या पोलीस अधिक्षकांनी सांगितले की, हरिहरेश्वर किनारी एक अनोळखी बोट लागली असून मौजे भरडखोल किनाऱ्यावर एक लाईफबोट आली आहे. दोन्ही बोटीमध्ये कोणीही व्यक्ती आढळून आलेल्या नाहीत. कोस्ट गार्ड व MMB यांना याबाबत सूचना देण्यात आलेली आहे. पोलीस विभागाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.