ठाण्यातल्या सभेचा टीझर मनसेकडून प्रदर्शित; राज ठाकरे देणार ‘करारा जवाब’, टीझरमधील दिग्गज नेत्यांवर होणार हल्लाबोल

ठाणे
भरत जाधव
Updated Apr 10, 2022 | 08:33 IST

राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांची गुढीपाडव्याच्या दिवशी झालेली सभा अजूनही चर्चेत आहे. या सभेत उपस्थितीत केलेल्या मुद्द्यांवरुन राज ठाकरेंवर सत्ताधारी पक्षाने जोरदार हल्ला चढवला होता.

Teaser of meeting in Thane screened by MNS
ठाण्यातील राज ठाकरेंच्या सभेचा टीझर पाहिला का?   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतल्या काही मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.
  • मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत सभेचा टीझर दाखवला.

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांची गुढीपाडव्याच्या दिवशी झालेली सभा अजूनही चर्चेत आहे. या सभेत उपस्थितीत केलेल्या मुद्द्यांवरुन राज ठाकरेंवर सत्ताधारी पक्षाने जोरदार हल्ला चढवला होता. मशिदींवरील (Mosque) भोंग्यांमुळे राज ठाकरेंवर टीकेचा भोंगा सुरू झाला, आता या भोंग्याला बंद करण्यासाठी ठाण्यात मनसेची (MNS) सभा होणार आहे. या सभेतून अनेक नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला जाणार असल्याचं टीझर मनसेकडून दाखवण्यात आले आहे. 

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे. देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शरद पवार, संजय राऊत आणि अजित पवार यांनी केलेल्या टीका आहेत. या सर्व टीकांवर राज ठाकरे ठाण्याच्या सभेत उत्तर देणार आहे. या सर्व टीकांना राज ठाकरे ‘करारा जवाब’ देणार असे म्हटले आहे.
दरम्यान, मशिदींवरच्या भोंग्यांबद्दलच्या राज ठाकरे यांच्या विधानामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतल्या काही मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. तसंच पुण्यात वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरूनही हकालपट्टी करण्यात आली.

या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे या बोलणार ही चर्चा सुरू आहे.  ठाण्यात १२ एप्रिलला होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टीझर मनसेकडून रिलीज करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरेंच्या भाषणावरील राजकीय प्रतिक्रियांना या सभेतून उत्तर दिलं जाणार आहे. राज ठाकरेंच्या १२ एप्रिलला पार पडणाऱ्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी