Ashish Shelar । ठाकरे सरकारमुळे शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ; विद्यार्थी आणि शिक्षक सैरभैर

ठाणे
प्रशांत जाधव
Updated Nov 25, 2021 | 17:57 IST

Ashish Shelar on Thackeray govt Education policy। कोरोना आपत्तीच्या काळात राज्यातील ठाकरे सरकारमुळे शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ झाला असून, महाविकास आघाडी सरकार नापास झाले आहे.

Thackeray government sabotages education sector Ashish shelar say
ठाकरे सरकारमुळे शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ; विद्यार्थी आणि शिक्षक सैरभैर 
थोडं पण कामाचं
  • भाजपा नेते माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांची टीका
  •  कोरोना आपत्तीच्या काळात राज्यातील ठाकरे सरकारमुळे शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ झाला असून, महाविकास आघाडी सरकार नापास झाले आहे.
  • विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक सैरभैर झाले आहेत, अशी टीका राज्याचे माजी शिक्षण मंत्री व आमदार आशिष शेलार यांनी आज येथे केली.

Ashish Shelar on  Thackeray govt Education policy। ठाणे :  कोरोना आपत्तीच्या काळात राज्यातील ठाकरे सरकारमुळे शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ झाला असून, महाविकास आघाडी सरकार नापास झाले आहे. तर विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक सैरभैर झाले आहेत, अशी टीका राज्याचे माजी शिक्षण मंत्री व आमदार आशिष शेलार यांनी आज येथे केली. सध्याच्या परिस्थितीत नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आशादायक असून, सर्वांनी देशाच्या पुनर्निमितीत सहभाग घ्यावा, असे आवाहन शेलार यांनी केले. (Thackeray government sabotages education sector Ashish shelar say)


ठाणे शहर भाजपा - शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ आणि आदर्श विकास मंडळातर्फे गडकरी रंगायतनमध्ये आयोजित केलेल्या शिक्षण परिषदेत आमदार आशिष शेलार बोलत होते. या वेळी भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर,  भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, संदिप लेले,  मृणाल पेंडसे, प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे, सोमय्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. विजय जोशी, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते डॉ. नरेंद्र पाठक, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, भाजपाचे पदाधिकारी विलास साठे, राजेश मढवी, सुजय पत्की, शिक्षण क्षेत्रातील कमलेश प्रधान, मीरा कोरडे, केदार जोशी, बाळासाहेब खोल्लम, धनंजय विसपुते, आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष व भाजपाच्या शैक्षणिक संस्था प्रकोष्ठचे संयोजक सचिन बी. मोरे यांची उपस्थिती होती.


कोरोनाने शैक्षणिक क्षेत्रात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थाचालकांच्या पातळीवर मानसिकतेपासून व्यावहारीक स्तरावरील अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरू होण्याची चर्चा आहे. वाढीव फी, शिक्षक समायोजन, अकरावी प्रवेश आदी प्रश्नांवर तोडगा निघालेला नाही. केवळ मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला जात असून, महाविकास आघाडी सरकार नापास झालेले आहे. सर्व शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला असून,सर्वच घटक सैरभैर झाले आहेत, अशी टीका आमदार शेलार यांनी केली.


विद्यापीठाच्या कामांच्या निविदा मंत्री ठरवीत आहेत. विद्यापीठाने सार्वभौमत्व गमावले आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाची आशा आहे. नवे शैक्षणिक धोरण सर्वांनी समजावून घेऊन देशाच्या पुनर्निमितीत योगदान द्यावे, असे आवाहन आमदार शेलार यांनी केले. आदर्श विकास मंडळाचे सचिन बी. मोरे यांनी आयोजित केलेल्या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्नांना गती मिळेल. आगामी काळात शिक्षकांची भूमिका महत्वाची असून, आम्ही शिक्षक, संस्था आणि संघटनांच्या पाठीशी कायम राहू, अशी ग्वाही आमदार संजय केळकर यांनी दिली. सचिन मोरे यांनी प्रास्ताविक केले. तर विमल गोळे यांनी आभार मानले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी